Home विदर्भ जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कडून नवबौध्द घटकांच्या वस्ती मधील कामाची पाहणी...

जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कडून नवबौध्द घटकांच्या वस्ती मधील कामाची पाहणी .

629

वर्धा / देवळी (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील देवळी तालुक्यामध्ये समाज कल्याण समिती सभापती जि. प .वर्धा विजय आगलावे यांचा विविध कामाच्या पाहणी दौरा झाला.

यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्ती मधील कामाची पाहणी करण्यात आली. तसेच व्यक्तीगत लाभार्थीची माहिती घेतली.
गौळ सर्कल मधील दिघी बोपापुर येथून प्रांरभ करण्यात आला. 20% सेस फंड योजना , विद्युत पोल तारे,नाली व रोड बांधकाम इत्यादी कामाची पाहणी सभापती महोदय यांनी केली.
जि.प.वर्धा येथील तांत्रिक अधिकारी व कर्मचारी तसेच पंचायत विभाग विस्तार अधिकारी दिलीप ढोने सोबत होते.
ग्रामपंचायत कार्यालय व कामाची पाहणी करतांना काही गावामध्ये कामांचा फलक नाही.काम पुर्ण झाले नाहीत. असे आढळून आले.या चौकशी दरम्यान तात्काळ निर्देश देवून पुर्ण करायचे आदेश दिले.