Home विदर्भ पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य व मदत करा –  प्रदेशाध्यक्ष डॉ.संघपाल उमरे

पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य व मदत करा –  प्रदेशाध्यक्ष डॉ.संघपाल उमरे

209

अकोला –  मूर्तिजापूर येथे आयोजित हॉटेल व-हाडी चव सभागृहात आयोजित पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार व विशेष कार्य करणाऱ्यांना प्रमाणपत्र,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पोलिस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ.संघपाल उमरे सर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना पोलीस मित्र परिवार व समन्वय समितीची ध्येय-धोरणे व समितीची व पदधिकाऱ्यांची भूमिका समजून सांगतांना सांगितले की आपण समाजात समाजसेवा करण्याचा आव आणतो देखावा करतो एवढा सार करुनही समाजिक स्थिती माञ सुधरतांना दिसत नाही.१८ ते ३५ वयोगटातील तरुणांचा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आलेख जर तपासला तर सर्वात जास्त संख्या वाढलेली दिसून येते यासाठी पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ही गुन्हेगारी किंवा त्यांच्यावर दाखल होणारे गुन्हा बाबत व कायद्याच्या चौकटित राहुन गुन्हेगारी प्रवृत्ती कसी कमी करता येईल यासाठी आपली भूमिका महत्त्वाची आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी महाविद्यालयीन जीवनापासून सुरू होतांना जास्तच दिसत आहे वर्ग ११ व्या वर्गापासूनच आपल्या मुलांवर लक्ष देणे गरजेचे शाळा-कॉलेजच्या रस्त्यांवर चिडीमारी करणाऱ्यांची गर्दी कशी वाढते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.महिलांनी दामिनी पथकांन सोबत समन्वय साधुन मुलिंचे संरक्षण कसे करता येईल याबाबत वारंवार महाविद्यालयात जाऊन चर्चा व मुलिंना माहिती दिली पाहिजे नाहितर समाजसेवा म्हटले तर मेलेल्या माणसाला खांदा देणे नव्हे तर जीवंत माणसांना आधार द्या असे मनोगत समीतीचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले सोबतच कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला प्रामुख्याने प्रा.एल डी सरोदे प्रा राजकन्या खणखणे, विष्णू लोडम,विलास वानखडे, दिवाकर सोनोने, मिलिंद इंगळे यांचा कोरोना योद्धा म्हणून विशेष कार्य केल्याबद्दल गौरवण्यात आले व उपस्थित पदाधिकाऱ्यांना समितीचे नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. संघपाल उमरे,राज्य मुख्य सल्लागार सुभाष सोळंके,विभागीय प्रमुख मनीष गुडदे,अमरावती जिल्हा अध्यक्ष कैलास विंचुरकर,राजेंद्र तांबेकर अमरावती महासचि व तालुका अध्यक्ष शाम प्राजंळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमास उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रा एल डी सरोदे,प्रा राजकन्या खणखणे,दिवाकर सोनोने, विष्णु लोडम,विलास वानखडे ,नितीन परांजपे , सीमा ढिसाळे,. मिलिंद इंगळे, राकेश जोशी ,दिनेश श्रीवास ,भारती इंगळे ,सुनील वानखडे ,प्रमोद इंगळे ,नितीन चीतोडे, सुधीर कोकणे, राजकुमार जामनीक कार्यक्रमाच्या शेवटी वृक्षारोपण करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव पाटील यांनी तर आभार दिवाकर सोनवणे यांनी मानले.