Home बुलडाणा सेवानिवृत्त नायब सुभेदार गजानन बळी यांचा देऊळगाव माळी गावकऱ्यांनी केला भव्य सत्कार………..

सेवानिवृत्त नायब सुभेदार गजानन बळी यांचा देऊळगाव माळी गावकऱ्यांनी केला भव्य सत्कार………..

276

फुलानी सजवलेल्या गाडीतुन काढली मिरवणूक … लंगोटी यार ग्रुपचा समाजापुढे नवा आदर्श…….

बुलढाणा देऊळगाव माळी (प्रतिनिधी) कैलास राऊत ता.२१. देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या देऊळगाव माळी येथील सैनिकाचे गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले.

देऊळगाव माळी येथील गजानन काशिनाथ बळी हे भारतीय सैन्य दलात२६ वर्ष देशसेवेत कार्यरत होते. 18 जुलै रोजी ते सेवानिवृत्त झाले.
राष्ट्रभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या संपूर्ण गावभर वाजत, गाजत मिरवणुक काढण्यात आली.
गावकऱ्यांच्या वतीने झालेला अनोखा सत्कार पाहून वीर जवान गजानन बळी भारावून गेले.
देशरक्षणार्थ विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर सैन्य दलातील सेवानिवृत्त झालेल्या देऊळगाव माळी येथील सैनिकाचे गावकºयांनी अनोख्या पद्धतीने जल्लोषात स्वागत केले. 18 जुलै रोजी हा स्वागत समारोह झाला असून हलगी ताशे पथकाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दे.माळी येथील गजानन काशिनाथ बळी हे भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. 18 जुलै रोजी ते सेवानिवृत्त झाले. 18 जुलै रोजी ते आपल्या मूळ गावी देऊळगाव माळी येथे येणार असल्याने गावातील लंगोटी या ग्रुपच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. येथील गावातील स्वागत कमानीजवळ आगमन होताच लंगोटी यार ग्रुपचे सदस्य व संपूर्ण गावातील नागरीक, व्यावसायीक, महात्मा फुले महाविद्यालय, पांडुरंग, संस्थान, ग्रा.पं.कार्यालय, विविध संघटना,अधिकारी पदाधिकारी यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत केले. तेथुन हलगी ताताशा पथकाच्या गजरात राष्ट्रभक्तीपर गीतांच्या निनादात त्यांच्या राहत्या घरापर्यंत व संपूर्ण गावातून, वाजतगाजत मिरवणुक काढण्यात आली. गल्लोगल्ली गावातील महिलांनी रांगोळी काढुन औक्षण करीत स्वागत केले. या भव्य मिरवणूक चा समारोप महात्मा फुले महाविद्यालयाच करण्यात आला त्यावेळी गावातील आजी माजी सैनिक उपस्थित होते . लंगोटी या ग्रुपचे अरुण बळी डॉ.गजानन गिर्हे, डा.अविनाश गाभणे , रविंद्र कुलकर्णी , विजय जुनारे , अतुल धनमणे, अजित बेगानी, डॉ.श्याम सुरूशे, पांडुरंग मगर , ग्रुपच्या सर्व सदस्यांनी त्यांचे भव्य भेटवस्तू देऊन सत्कार केला , यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती गजानन बळी त्यांच्या पत्नी मालतीताई बळी होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच किशोर गाभणे तर प्रमुख अतिथी म्हणून दिगंबर अंभोरे वसंतराव मगर, शेषराव सुरूशे, राजेश मगर ,प्राचार्य विश्वनाथ बाहेकर ,पांडुरंग केंधळे सर, नारायण बळी ,पत्रकार कैलास राऊत, क्रांतीसुर्य तालीम संघाचे अध्यक्ष किसनराव बळी, डॉ.डि .व्ही. काशिनाथ बळी व त्यांच्या पत्नी, शेषराव सुरूशे ,विजय राजगुरू , व्ही टी गाभणे भास्कर गवई यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते यावेळी गावकऱ्यांच्या वतीने झालेला अनोखा सत्कार पाहून गजानन बळी भारावून गेले. यावेळी सत्काराला उत्तर देतांना ते म्हणाले की, सेवानिवृत्ती नंतरचे माझे जीवन गावातील तरुणांना देशसेवा, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी व एकोपा निर्माण करण्यासाठी कार्य करीन असे सांगितले. यावेळी सरपंच किशोर गाभणे यांनी आपल्या भाषणात इथून पुढे देऊळगाव माळी गावातील जे सैनिक सेवानिवृत्त होतील त्यांचा असाच भव्य सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले, कार्यक्रमाला गाव व परिसरातील बहूसंख्य नागरीक, महिला, विद्यार्थी, माजी सैनिक, अधिकारी, पदाधिकारी, आजी सैनिक असा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन अरूण बळी यांनी तर आभार जयाताई बळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लंगोटी यार ग्रुपच्या सर्व सदस्य व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले…..