दुःखद घटना…
अमीन शाह
अकोला , दि. २२ :- आज एका जन्मदात्या आईने आपल्या दोन वर्षीय चिमुकलया मुलीस पाण्याच्या टाकीत बुडवून मारून टाकले व स्वतः ही जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज ५ वाजता गजानन नगर भागात घडली आहे , घडलेल्या घटने मुळे परिसरात हळहळ दुःख वयकत केले जात आहे .
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथील डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गजानन नगर येथे वास्तव्यास असलेल्या गिरीधर इंगोले हे आज काही कामा निमित्त बाहेर गावी गेले होते घरी त्यांची पत्नी रुपाली इंगोले व दोन वर्षीय चिमुकली आनंदी हे होते तर मोठी मुलगी शेजारी खेळत होती घरी कोणी नसल्याची संधी साधून रुपाली याने आपल्या दोन वर्षीय चिमुकली मुलगी आनंदी यास पाण्याच्या टाक्यात बुडविले व तिला मारून टाकले त्या नंतर या निर्दयी मातेने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा तो प्रयत्न फसला आणि गळफास तुटला त्या मुळे रुपाली ने स्वतः जाळून घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही बाब सासू सासरे घरी आल्यावर त्यांना हा गंभीर प्रकार दिसला त्यांनी आरडा ओरड करताच शेजारी धावून आले व त्या दोघांना रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी या दोघांना मृत घोषित केले या प्रकरणी डबकी रॉड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या विवाहितेने आपल्या चिमुकली सह आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करीत आहे परिसरात वेग वेगड्या चर्चा सुरू आहे घडलेल्या घटने मुळे परिसरात दुःख वायकत केले जात आहे.