अपघातातील तीघेही जागीच ठार
एकाचा मृतदेह झाडावर,दुसरा गाडीत तर तिसरा नालीत
रविन्द्र साखरे –
तळेगांव(शा.पंत):-नजीक असलेल्या चिस्तूर या गावा जवळ अमरावती वरून नागपूर कडे जात असलेल्या कार क्र Mh…. च नियंत्रण सुटल्याने महामार्ग क्र ६ वरील नदीच्या दरीत कार कोसळून चालक सह प्रवासी ठार झाल्याची घटना सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली
सविस्तर वृत्त असे आहे की..…
आज दिनांक 30 जुलै 2021 चे पहाटेच्या दरम्यान तळेगांव च्या चिस्तुर गावाजवळ एका MH30 P 3214 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर गाडीचा भीषण अपघात झाला आहे ज्यामध्ये तिघे जागीच ठार झाले तर एक जण आश्चर्यकारक वाचला आहे, मृतांमध्ये अमित गोयते वय 32 वर्ष रा बडनेरा, शुभम गारोडे वय 25 वर्ष रा अमरावती, आशिष माटे रा राजुरा जि अमरावती, हे तिघे जागीच ठार झाले असून तर शुभम भोयर हा सुखरूप वाचला आहे, हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे ,तर एकाचा मृतदेह हा झाडावर अडकला होता तर दुसरा गाडीत अडकला होता तिसरा मृतदेह बाजूला पडून होता .पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असे सांगण्यात आले आहे.कारण मोठे पळसाचे झाड तोडून ही गाडी उडून बाजूला फेकली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, जमादार राजेश साहू, सुधीर डांगे,श्याम गहाट,राहुल अमोने, अनील चिलघर, देवेंद्र गुजर,विजय उईके, रमेश परबत यांनी मोठी कसरत करून मृतदेहांना उत्तरीय तपासणी साठी पाठवले. यामध्ये जळगाव येथील युवक कादर खान यांनी व बाकीच्या युवकांनी पोलिसांना मोठी मदत केली.