Home विदर्भ अन् यवतमाळ तहसील मध्ये पडला रक्तांचा पाऊस

अन् यवतमाळ तहसील मध्ये पडला रक्तांचा पाऊस

912

देवानंद जाधव – विशेष प्रतिनिधी

यवतमाळ – तहसील कार्यालयात जिल्हाधीकारी अमोल येडगे, यांचे अनमोल मार्गदर्शनात नुकताच महसुल दिन साजरा करण्यात आला. माञ त्या कार्यक्रमाला सामाजिक ऊत्तरदाईत्वाच्या जाणीवेचा स्पर्श झाला.

तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी, अतुट आत्मीयतेच्या विलोभनीय धाग्यांनी रक्तदात्यांची मने एका धाग्यात ओऊन, अल्पावधीतच तहसीलच्या प्रांगणात जणु रक्तांचा पाऊस पाडला. अन् रक्त पिशव्यांचा महसुल गोळा केला. प्रशासनातील अजातशञु कुणाल झाल्टे यांच्या रक्तदान करण्याच्या आवाहनाला हितचिंतकांनी मोठा प्रतिसाद दिला.

कोरोणा काळात घरादारांवर तुळसीपञ ठेऊन जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारा कोरोणा योद्धा म्हणून झाल्टे यांचे कडे बघीतले जाते.
महसुल दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात, सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली येऊन आत्महत्या करणा-या, शेतक-यांच्या बायका पोरांना मायेच्या ममतेने विचारपुस करत शासकीय मदतीचे धनादेश वितरित केले. गावातील राशन दुकान म्हणजे ख-या अर्थाने गावच्या भाकरीचा डेपो असतो, ति भाकर समाजातील अंतीम टोकाच्या माणसांपर्यंत पोहोचावी आणि गोर गरीबांची भुकेची आग शमावी, या उदात्त हेतुने अनेकांना तत्काळ राशन कार्ड याच कार्यक्रमात दिले. दारिद्र्य, वाढती महागाई, निराधारता, भुक, न परवडणारे आजार, इत्यादी व्याधी व्याधींनी उध्वस्त झालेल्या गरजुंना आधार दिला. निवडणुक ओळखपञासह ,विविध डझनभर शैक्षणिक प्रमाणपञ एकाच छताखाली देऊन पालकांना , हेलपाटे मारण्यापासुन वाचविले.
” बा…शेतक-या…
बघ प्रयत्न करुन,
हार तु मानु नकोस,
लढता लढता जाऊ दे प्राण,
पण आत्महत्या तु करु नकोस “
हा लाखमोलाचा संदेश तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी कुणाल झाल्टे यांनी पंचक्रोशीतील पेरला. आयुष्यात दुःखाच्या गणिताला सोडविण्याचे सुञ अनुभवातून शिकावी लागतात. असा साधा सरळ विचार त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी समोर ठेवला.
महसुल दिनाच्या बहु आयामी कार्यक्रमात जिल्हाधीकारी अमोल येडगे, निवासी ऊप जिल्हाधीकारी ललीत कुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी तहसीलच्या प्रांगणात वृक्षारोपण करुन, ” वृक्ष वल्ली, आम्हा सोयरे ” असा सुचक संदेश ऊपस्थीतांना दिला.
कार्यक्रमाला अजय गौरकार, राजेश कहारे, राजेश चिंचोरे, एकनाथ बिजवे, वकिला म्हस्के, सुनंदा राऊत, यांचे सह अवघे नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, सेतु सुविधा केंद्राचे कर्मचारी ऊपस्थीत होते.
एकंदरीत महसुल दिनाचा कार्यक्रम असला तरी, तहसीलदार कुणाल झाल्टे आणि सहका-यांनी रक्त दान करुन, सामाजिक ऊत्तरदाईत्वाची जाणीव ठेवली. आणि म्हणूनच यवतमाळ तहसील मध्ये पडला रक्तांचा पाऊस,आणि रक्त पिशव्यांचा झाला महसुल गोळा. अशी ह्रदय स्पर्शी आणि भाव विभोर भावना ऊपस्थीतांची झाली.