घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील, टेंभी अंतरवाली गावचे जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड जगन्नाथ अण्णा भिल्लारे यांचे काल दि. 1 ऑगस्ट 2020 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याखाली त्यांना अखेरचा लाल सलाम करण्यात आला.
अण्णा हे कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सहवासातील नेते होते. या चंगळवादी दुनियेतही त्यांची लाल झेंड्यावरील अपार निष्ठा कमी झाली नाही. त्यांनी अखेरचा श्वास कम्युनिस्ट पक्षामध्ये घेऊन निरोप दिला. त्यांच्या जाण्याने कम्युनिस्ट पक्षामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,मुली, नातवंडे, असा मोठा परिवार आहे.