प्रतिनिधी-: धनराज खर्चान
अमरावती / भातकुली – सी.आर.पी.एफ मध्ये सहाय्यक उपपोलीस निरीक्षक ( 191बटालियन CRPF ) गडचिरोली या ठिकाणी कार्यरत होते,
कादर कलदर शहा (52), रा. शिगणापूर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सोमवारी 11 वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील मूळ गावी शिंगणापूर येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सेवेत असतानाच त्यांना आजाराने ग्रस्त झाले होते. कुटुंबीयांनी त्यांना परत बोलावून अमरावती येथे खासगी रुग्णालयात दाखल केले.
परंतु, प्रकृतीत सुधार न होता ती खालावतच गेली. रविवारी दुपारी 2 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.