Home बुलडाणा आहो चोरांनी दारूची दुकान फोडली अन , दारू नाही चोरली ???

आहो चोरांनी दारूची दुकान फोडली अन , दारू नाही चोरली ???

659

 

गुन्हा दाखल तपास सुरू ,

भगवान साळवे ,

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील देशी दारूच्या दुकाना चे टिन पत्र कापून अज्ञात चोरट्यांनी गल्यात असलेले 50 हजार रुपये चोरून नेलयाची घटना10 तारखेच्या रात्री घडली आहे मात्र चोरट्यांनी यातील देशी दारूची एकही बॉटल चोरून नेली नाही
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर पांग्रा येथे कृषीद बेगम खलील हुसेन सिद्दिकी यांचे देशी दारू दुकान असून सदर दुकान व्यंकना गोलापल्ली हे चालवितात काल रात्री त्यांनी दुकानाचा आलेले गल्ला आणि जवळ असलेले काही पैसे दुकानाच्या गल्ल्यात ठेवून दुकान व्यवस्थित बंद करून रात्री घरी गेले सकाळी जेव्हा त्यांनी दुकान उघडले असता त्यांना चोरट्यांनी दुकानाचे टिन पत्र कापून आत प्रवेश करीत गल्ल्यात असलेले 50 हजार रुपये चोरून नेले लक्षात आले मात्र ही चोरी करताना एकही देशी दारूची बाटली चोरून नेली नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान तेथे सीसीटीव्ही असून देखील ज्या ठिकाणी सीसीटीव्हीचे फुटेज दिसते त्याठिकाणी चोरटे आले नाहीत याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसात तक्रार देण्यात आली असून घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक दीपक राणे बीट जमादार नारायण गीते जमादार मुंडे ,वाहन चालक गजानन वाघ आदिनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असून पुढील तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत