Home साहित्य जगत स्वातंत्र्य दिन शुभेच्छा कविता “ग्वाही”

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा कविता “ग्वाही”

598

अमृत महोत्सव आला
समस्या संपल्या नाही
पाऊलखुणाइंग्रजांच्या
गुलामीची देई ग्वाही

हतबल सारासातबारा
बोलतोयं भिक्षाम् देही
सिमा वाद होई वृध्दी
भावा भावात ही दुही

प्रजासत्ताक देश जरी
जाणवते हिटलरशाही
अंधश्रद्धा साखळदंड
प्रगतीचे स्वप्नेचं पाही

महिला सुरक्षा तोकडी
वासनागी लाही लाही
खटल्याच्या पडे राशी
निर्णयाची वाट पाही

अर्थ व्यवस्था ढासळे
चटके हे असह्य साही
कोरोनाच्या संकटात
भर पडली ही विद्रोही

अंतराळी प्रगती गति
पोचलो आम्ही परग्रही
शांतता राज्यात नाही
विवाद आपल्याचं गृही

सोसवेना भार आता
बदलावी रे दंडेलशाही
पुढे यावी पिढी नवी
वाचवावी लोकशाही

स्वतंत्रता कळावाअर्थ
भारत माते त्राही त्राही
बदलाव येईलं नक्की
आश्वासक दिशा दाही

– हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६