कृषीकन्या वैष्णवी शिंबरेने शिकविल्या पाककृती
यवतमाळ – डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय कोंघारा येथील विद्यार्थीनी वैष्णवी गजानन शिंबरे हिने कापरा येथील बचत गटाच्या (स्वयंसहायता समूह) महिलांना विक्रीयोग्य कैरीचे लोणचे कसे बनवावे याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत महिलांना लोणचे बनवतांना बाजारातून लोणच्यासाठी कैरीची निवड कशी करावी इथपासून ते मसाल्याचे प्रमाण व ते घालतांना चवीनुसार घ्यावयाची काळजी तसेच या पद्धतीने घरगुती व चटपटीत लोणचे बनवून तुम्ही तुमच्या गटाला उद्योगाची संधी प्राप्त करून देऊ शकता असे सांगून ग्रामीण महिलांना प्रेरित केले. यावेळी कापरा येथील माँ वैष्णवी महिला बचत गटाच्या संपूर्ण महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी उद्यानविद्या विषयाच्या प्रा. इंजाळकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम प्रमुख विशाल भाकडे व शिक्षकांचे सहकार्य लाभले.