Home विदर्भ कापरा येथे शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन , “कृषीकन्या वैष्णवी शिंबरेचा पुढाकार”

कापरा येथे शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे मार्गदर्शन , “कृषीकन्या वैष्णवी शिंबरेचा पुढाकार”

201

यवतमाळ – तालुक्यातील कापरा येथे शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया कशी करायची, याबाबत शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाशी संलग्नित कृषी महाविद्यालय कोंघारा येथील विद्यार्थिनी कृषीकन्या वैष्णवी शिंबरे हिने गावातील शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले.

बीज प्रक्रिया कशी करावी, ती करताना घ्यावयाची काळजी, बीज प्रकियेचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना होणारा फायदा याबाबत वैष्णवी शिंबरे हिने मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या शंका व प्रश्नांनाही तिने समर्पक उत्तरे दिली. या शिबिरासाठी वैष्णवीस महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम प्रमुख विशाल भाकडे, प्रा. हेमंत वानखडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. दत्ता जाधव, प्रा. काजल माने, प्रा. पल्लवी येरगुळे आदींचे मार्गदर्शन लाभले. या मार्गदर्शन शिबिरास गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.