रावेर( शेख शरीफ)
ऑल इंडिया आयडियल टीचर्स असोसिएशन (आयटा) ही एक राष्ट्रव्यापी शिक्षक संघटना आहे, जिचा स्वतःचा धोरणात्मक कार्यक्रम आणि कार्य रचनाआहे ज्याच्या प्रकाशात शिक्षक प्रशिक्षण, शिक्षकांच्या समस्या आणि शैक्षणिक धोरणे तयार केली जातात. रविवारी 22 ऑगस्ट 2021 रोजी आयटाच्या , राज्य कार्यकारणीआणि जिल्हाध्यक्षांची बैठक मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती, ज्याचे अध्यक्ष श्री अब्दुल रहीम शेख साहिब (राष्ट्रीय अध्यक्ष आयटा ) होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र आयटाचे कौतुक केले. केंद्राच्या धोरण कार्यक्रमाच्या प्रकाशात, आयटा महाराष्ट्राने सर्वप्रथम आपला धोरणात्मक कार्यक्रम तयार करून तो प्रकाशित केला आणि त्याचे अनावरण केले आहे. आपल्या संबोधनात त्यांनी केंद्रीय धोरण कार्यक्रम तयार करण्याची आणि ती पुस्तिकेच्या रूपात लोकांसमोर सादर करण्याची प्रक्रिया सविस्तर सांगितली आणि सर्व जबाबदार व्यक्ती आणि सदस्यांना त्याचे पालन करण्याचे आवाहन केले. आयटा महाराष्ट्रचे उपाध्यक्ष श्री रियाज-उल-खालिक (नागपूर)यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जिल्हाअध्यक्ष व जिल्हासचिव यांच्या कामगिरीवर मार्गदर्शन केले. विविध कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जबाबदार असलेल्या सर्वांचे अभिनंदन, शैक्षणिक जागरूकता मोहीम “कुठल्याही परिस्थितीत शिक्षण सुरू”. राबविण्यात आलेली शैक्षणिक जनजागृती अभियान संदर्भात आयटा महाराष्ट्राच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
आयटा चे राज्य सचिव अतीक शेख यांनी विविध भागात आयटा ची शाखा स्थापन करण्याच्या अटी व शर्तींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. विशेषतः जिल्हाध्यक्षांना संबोधित करताना त्यांनी प्रत्येक तालुक्यात आयटा युनिट सुरू करण्यावर भर दिला. याव्यतिरिक्त, विविध पैलूंसाठी जबाबदार असलेल्यांना मार्गदर्शन केले आहे. या प्रसंगी, श्री सय्यद शरीफ (अध्यक्ष आयटा महाराष्ट्र) म्हणाले की, आदर्श शिक्षक संघटना त्यांच्या पद अधिकाऱ्यांना आदर्श कामगिरी करावी अशी इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, समाजातील शिक्षकांची स्थिती पुनर्संचयित करणे AIITA महाराष्ट्राच्या चार वर्षांच्या कार्यक्रमात प्राधान्य तत्वावर समाविष्ट केले गेले आहे आणि त्यानुसार राज्यातील विविध युनिट्सद्वारे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी. संघटना तर्फे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचेही स्वागत केले. यावेळी त्यांनी सर्व शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य, विश्वस्त आणि शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांचे आभार मानले ज्यांनी धोरण आणि कार्यक्रम तयार करताना आपल्या मौल्यवान सूचना दिल्या.