रावेर (शेख शरीफ)
तालुक्यातील बक्षीपुर येथील रहीवाशी चि. यज्ञेश दिलीप महाजन (वय अडीच वर्षे) या चिमुरड्याचे आज दि. २७ रोजी सकाळी ४ च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. तो जि.प. बांधकाम विभागाचे सेवा निवृत्त कर्मचारी अर्जुन शंकर महाजन यांचा नातू व प्रगतीशील शेतकरी दिलीप महाजन यांचा मुलगा तर साकळी ता. यावल शाळेतील मनोज महाजन सर यांचा पुतण्या आहे. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, लहान भाऊ व मोठया बहिणी असा परिवार आहे.