प्रतिनिधि
उपजीविकेसाठी दिवसभर बारा महिने रानोमाळ फिरणार्या बारा बलुतेदारांसाठी फिरते कोरोणा लसीकरण केंद्र उभारण्याची मागणी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा परभणी लोकसभा उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकऱ्यांनी तहसिलदारामार्फत आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.
यासंदर्भात त्यांनी नुकतेच गंगाखेड तहसिलदार मार्फत निवेदन आरोग्यमंत्र्यांना पाठवले .या निवेदनात म्हटले आहे की मागील काही दिवसांपासून शहरी व ग्रामीण भागात लसीकरण सुरू आहे . ज्येष्ठ व्यक्ती सह अठरा वर्षाखालील युवकांनाही लस उपलब्ध झालेली आहे. पण लस घेण्यासाठी व्यक्ती जागेवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रानोमाळ भटकंती करणाऱ्या बारा बलुतेदार पर्यंत लस अद्याप पोहोचली नाही. कोरोणाचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी ही लस या सर्व व्यक्तीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने मेंढपाळ, मच्छीमार , चांभार , परीट, लोहार, माती कामगार, बांधकाम कामगार, कैकाडी, गोंधळी ,वासुदेव, रामोशी, न्हावी, सुतार, कुंभार, जडीबुटीवाले यांच्यासारखा बारा बलुतेदाराकडे ही लस पोहोचणे आवश्यक आहे .तरी यासाठी प्रशासनाने याचे नियोजन करू कोरोणाचा समूळ नायनाट करण्यासाठी फिरते लसीकरण केंद्र उभारावी अशी मागणी सखाराम बोबडे पडेगावकऱ राहुल साबणे यांनी केली आहे .ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रातील शेकडो बारा बलुतेदारांना याचा लाभ होणार आहे.