Home परभणी शेतकऱ्यांच्या मागण्या पोहोचल्या थेट रेल्वेमंत्र्या पर्यंत

शेतकऱ्यांच्या मागण्या पोहोचल्या थेट रेल्वेमंत्र्या पर्यंत

128

गंगाखेड तालुक्यातील पडेगाव व शेजारील मरगळवाडी येथील शेतकऱ्यांच्या रेल्वेशी निगडित मागण्या रेल्वेमंत्री पर्यंत पोहोचल्या . सखाराम बोबडे पडेगावकर यांनी या संदर्भात पाठपुरावा केला होता.

रेल्वे सल्लागार बोर्डाचे सदस्य आनंद बनसोडे यांनी या संदर्भात थेट रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. पडेगाव येथे भुयारी रेल्वे पुलाचे काम चालू आहे. यामुळे शेतकऱ्यांचा रस्ता बंद झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. त्याचबरोबर बाजूच्या मरगळवाडी तालुका सोनपेठ येथे रेल्वे गेट नसल्यामुळे मरगळवाडी वासियांना मुख्य बाजारपेठ गाठण्यासाठी दहा किलोमीटर लांबून द्यावे लागते. या भागातील शेतकऱ्यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या कानावर ही बाब घातली होती. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सर्व माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य आनंद बनसोडे यांना पाठवण्यात आली. त्यांनी यासंदर्भात रेल्वेमंत्री दानवे यांची भेट घेऊन निवेदन दिले. लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहेत.