Home विदर्भ “मामा” या पुस्तकाचे थाटात प्रकाशन..!

“मामा” या पुस्तकाचे थाटात प्रकाशन..!

218

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती -: श्री.विजयराव पुंडलीकरव दहातोंडे सहायक पोलिस उपनिरीक्षक यांच्या जीवनातील घडलेल्या प्रसंगावर आधारित “मामा” या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम दि.२९ऑगस्ट २०२१ रोजी “गोल्डन लिफ ” या सभागृहात थाटात संपन्न झाला.


श्री.विजयराव दहातोंडे हे ४ ऑगस्ट १९८९ रोजी पोलीस खात्यात रुजू झाले,पोलीस खात्यात नोकरी करीत असतांना, त्यांना जे चांगले वाईट अनुभव यायचे ते सर्व अनुभव ते आपल्या मुलांना सौरभ व हर्षद यांना सांगत असायचे. या अनुभवावर आधारित पुस्तक तयार करायचे व आपले बाबा जेव्हा सेवानिवृत्त होतील तेव्हा त्या पुस्तकाचे प्रकाशन करायचे अशी संकल्पना त्यांच्या दोन्ही मुलांच्या डोक्यात आली, व या संकल्पनेतूनच “मामा”या पुस्तकाची निर्मिती झाली.
या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणूनअमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय श्रीमती यशोमतीताई ठाकुर (महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य.) उपस्थित होत्या.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय डॉ.श्री.डि. एम.भांडे साहेब (माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते.तर आदरणीय श्री.देवेंद्रसिंग ठाकूर साहेब (पोलीस निरीक्षक अमरावती) यांच्या शुभहस्ते “मामा”या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला.तसेच श्री सचिन दशरथजी भांडे व डॉ सौ.अनुप्रीताताई सचिन भांडे (सरपंच म्हातोडी) यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्ती निमित्ताने श्री.विजयराव पुंडलीकराव दहातोंडे व सौ.रजनीताई विजयराव दहातोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री.आसाराम चोरमले साहेब (पोलीस निरीक्षक अमरावती) ,श्री.गोरखनाथ जाधव साहेब(पोलीस निरीक्षक अमरावती),श्री.पंजाबराव वंजारी साहेब (पोलीस निरीक्षक बडनेरा),श्री.विजय दिघे साहेब (पोलीस निरीक्षक अमरावती),श्री.राहुल आठवले साहेब(पोलीस निरीक्षक अमरावती) श्री.जयंतराव देशमुख साहेब (माजी शिक्षण व बांधकाम सभापती जि.प.अमरावती),श्री.हरिभाऊ मोहोड साहेब (माजी उपाध्यक्ष जि.प.अमरावती), ले.कर्नल श्री.लक्ष्मणजी गाले साहेब, श्री.किसनराव घाटे गुरुजी,श्री.समाधानजी दहातोंडे (माजी उपसभापती पं. स.भातकुली),श्री.रमेश किसनराव घाटे साहेब, डॉ.श्री सतीश तराळ साहेब, डॉ.मंदाताई नांदूरकर (मराठी विभाग प्रमुख मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात अमरावती) श्री.मनोहरराव बुध साहेब (भातकुली तालुकाध्यक्ष, शिवसेना),श्री.एकनाथराव जुवार साहेब (विभागीय अध्यक्ष, आदिवासी कोळी महासंघ),श्री.भास्करराव कोलटेके साहेब(विदर्भ अध्यक्ष, आदिवासी कोळी महासंघ) तसेच मोठ्या प्रमाणात आदिवासी कोळी महादेव समाज बंधू भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गजाननराव कासमपुरे (अध्यक्ष आदिवासी कोळी महादेव कर्मचारी संघटना जि.अमरावती.)यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन श्री.शैलेंद्र स.दहातोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.सौरभ विजयराव दहातोंडे यांनी केले.