Home जळगाव नविन पाण्याच्या टाकीसाठी भंगार पाईपचा वापर होणार “अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष”

नविन पाण्याच्या टाकीसाठी भंगार पाईपचा वापर होणार “अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष”

277

शरीफ शेख

रावेर , दि. २३ :- तालुक्यातील
कोचुर बु. येथील नविन पाण्याच्या टाकीसाठी भंगार पाईपचा वापर होणार . अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कोचुर बु , येथील दुर्गा नगर मध्ये गेल्या तीन वर्षापासून देखभाल दुरुस्ती अंतर्गत नविन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून या टाकीच्या पाईप फीटींग साठी ठेकेदाराने चक्क भंगार मधुन बिळाचे पाईप आणले असून त्यांना काळा कलर मारलेला असून ते बिळाचे पाईप नविन असल्याचे दिसत आहे .

भंगार पाईप असल्याचे सुज्ञ नागरीकांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी मला सांगीतले मी तिथ गेल्यावर ग्रा.पं सदस्या ललीता पाटील यांच्या समक्ष पाहाणी केली असता ते बिळाचे भंगार पाईप असल्याचे दिसून आले.
याबाबत मी पाणी पुरवठा जे.ई . लोखंडे साहेब व पाटील साहेब यांच्याकडे भ्रमणध्वनीवरून तक्रार केली आहे व वरीष्ठ पातळीवरून या पाणीपुरवठा योजनेची उच्यस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. आज दि २२l०१ I २०२० रोजी रात्री हे भंगार पाईप बेपत्ता झाल्याशिवाय राहाणार नाहीत तरी कोचुर बु॥ च्या ग्रामस्थांनी दुर्गा नगरमध्ये जाऊन सत्य परिस्थीती बघावी ही नम्र विनंती.
बिळाच्या पाईपांची भंगार मध्ये खरेदी केलेली असून त्यांना बारीक बारीक |शीद्रे पडलेले आहेत तसेच सर्व पाईपांच्या मध्ये क्षार असलेला थर दिसत आहे. चार फुट सहा फुट आठ फुट असे पाईपांचे तुकडे आणले आहे.

रविंद्र महाजन
ग्रा. पं. सदस्य
कोचुर बु, ता. रावेर