Home मराठवाडा टवाळखोरांना अद्दल घडविण्यासाठी गोंदी पोलिसांनी लढविली शक्कल

टवाळखोरांना अद्दल घडविण्यासाठी गोंदी पोलिसांनी लढविली शक्कल

428

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शाळेतील मुलीना थांबवून त्यांना त्यांच्या सुरक्षितते बाबत समजावण्यात आले.तसेच मुलींना शाळेच्या आवारात तसेंच गावात कोणीही टवाळखोर छेड काढून त्रास देत असेल किंवा पाठलाग करत असेल तर गोंदी पोलिसांना कळविल्यास संबंधितांवर ताबडतोब कार्यवाही करण्यात येणार असल्याचे गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी मुलींची भेट घेऊन पोलीस ठाण्याचा नंबर देऊन आवाहन केले.

टवाळखोरांकडून मुलींची छेडछाड करत असल्यास तुम्हाला याठिकाणी पोलिसांकडून कारवाई व्हावी,असे वाटत असल्यास त्या मुलींनी निःसंकोचपणे पोलिसांपर्यंत तक्रार पोहोचवल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे वचन दिले. शाळेतील मुली तसेच पालकांसाठी एक विशेष मोबाइल क्रमांक गोंदी पोलिसांनी कार्यान्वित केला असून, त्यावर माहिती देण्याचे आवाहन करण्यांत आले आहे.

हे पण वाचा –

आज गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना शाळेतील मुलिंना थांबवून त्याना जर गावातील व शाळेतील कोणी टवाळखोर मुले त्रास देत असतील तर गोंदी पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
– शितलकुमार बल्लाळ
पोलीस निरीक्षक गोंदी