Home विदर्भ घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू

घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू

201

रवींद्र साखरे

वर्धा –  ता.आर्वी दहेगाव(गोंडी) येथे साधारणतः 3-4 दिवसापासून संततधार अतिवृष्टी सुरू असलेल्या पावसामुळे रामकृष्णाजी चौधरी यांचे गावातील घर कोसळले त्यावेळेला ते स्वतः त्यांची पत्नी व मुलगा असं कुटुंब झोपेत होते. त्यामध्ये त्यांची पत्नी ज्योती रामकृष्णाजी चौधरी यांचे राहत्या घरामध्ये सकाळी साधारणतः 5 वाजताच्या सुमारास घराची भिंत कोसळल्या मुळे अपघाती निधन झाले. सकाळी झोपेत असताना ही घटना घडली. त्यात रामकृष्णाजी चौधरी व त्यांचा मुलगा यांना दावाखान्यात हलवण्यात आले होते त्यात रामकृष्णाजी चौधरी यांना डॉक्टरांनी पोहचता क्षणी मृत घोषित केले व मुलाची तबीयत चांगली आहे असे डॉक्टरांच्या माहितीवरून कळाले आहे.त्यांच्या पश्चात त्यांचे 2 मुले व वृद्ध आई वडील असा परिवार आहे.