➡️ उच्च न्यायालयाच्या आदेशाने सरपंच पद कायम….!
अयनुद्दीन सोलंकी,
———————-
घाटंजी (यवतमाळ) – घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हिने नियमानुसार मासीक सभा आयोजित केली नसल्याचा ठपका ठेउन अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 36 अंतर्गत 31 आँगस्ट रोजी अपात्र केले होते.
दरम्यान, सरपंच वर्षा कणाके हीने अँड. रोहन चांदुरकर, अँड. मेगधा चांदुरकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बुधवारी आवाहन याचीका क्रं. 3447/2021 दाखल केली. सदर प्रकरणात गुरुवारी उच्च न्यायालयात सुणावणी झाली. त्यात अँड. रोहन चांदुरकर, अँड. मेगधा चांदुरकर यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. त्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी दिलेल्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगीती दिली आहे.
सदर प्रकरणात महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हाधिकारी यवतमाळ, अपर जिल्हाधिकारी यवतमाळ, ग्रामपंचायत सचिव चिखलवर्धा, माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जैतु मेश्राम यांना उच्च न्यायालयात दाखल याचीकेत प्रतिवादी करण्यात आले होते.
घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथील सरपंच वर्षा भिमराव कणाके हीने चिखलवर्धा ग्रामपंचायतीचा प्रभार 18 फेब्रुवारी रोजी घेतला होता. त्यानंतर पहीली मासीक सभा 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आली. तद्नंतर 16 मार्च रोजी पुन्हा मासीक सभा आयोजित करण्यात आली. मात्र, कोरम पुर्ण न झाल्याने अभावी सदरची सभा तहकूब करुन तीच सभा 23 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. तरीही चिखलवर्धा येथील माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जैतु मेश्राम यांनी अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या न्यायालयात अर्ज दाखल करुन सरपंच वर्षा कणाके हीने मासीक सभा नियमानुसार आयोजित केली नसल्याचा ठपका ठेउन, यवतमाळचे अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी सरपंच वर्षा कणाके हिला 31 आँगस्ट रोजी अपात्र घोषित केले होते. या प्रकरणात यवतमाळचे अँड. परमेश्वर अडकीने यांनी याचिकाकर्ताची बाजू मांडली होती.
सदर अपात्रतेच्या आदेशाला सरपंच वर्षा कणाके हीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आवाहन याचीका दाखल केली होती. सदर प्रकरणात याचीकाकर्ता सरपंच वर्षा कणाकेतर्फे अँड. रोहन चांदुरकर, अँड. मेगधा चांदुरकर यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. सरकारतर्फे अँड. टी. खान यांनी, तर माजी सरपंच जैतु मेश्राम यांची बाजू अँड. कैलास नरवाडे यांनी मांडली.