Home बीड न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला...

न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला ,

250

 

अमीन शाह

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याने सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने 25 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. यासोबतच परळी अंबाजोगाई तालुक्या मध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे ‌.
न्या. सापटनेकर यांनी हा जामिन मंजूर केला. शर्मांच्या जामिनावर सोमवारी दि. 20 सप्टेंबर रोजी सुनावणी पुर्ण झाली होती. त्यात न्यायालयाने आज शर्मा यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला. म्हणून करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलीसांनी 5 सप्टेंबर रोजी त्यांना अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. सोमवारी न्या. सापटनेकर यांच्या न्यायालयात शर्मांच्या जामिन अर्जावर सुनावणी झाली. शर्मा यांच्यावतीने अॅड. भारजकर यांनी बाजू मांडली तर सरकार पक्षाच्या वतिने सरकारी वकिल अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर मंगळवारी न्यायालयाने करुणा शर्मांना जामिन मंजूर केला. शर्मा यांना तब्बल 16 दिवस कोठडीत काढावे लागले. करुणा शर्मा यापुढे काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.