आसेगाव जि.प.सर्कलमध्ये ‘सिंघम रिटर्न’
फुलचंद भगत
वाशिम:-अत्यंत चुरशीचे तसेच संपुर्ण जिल्हा परिषदेचे लक्ष लागुन असलेल्या आसेगाव सर्कलमधुन पुन्हा एकदा राकाॅ चे चंद्रकांत ठाकरे यांनी विजय मिळवला आहे.वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 5 जागांवर विजय मिळवला आहे.
वाशिम जिल्हा परिषदेच्या जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. वाशिम जिल्हा परिषदेच्या एकूण 14 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि या सर्व जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) सर्वाधिक म्हणजेच 5 जागांवर विजय मिळवला आहे. तर भारतीय जनता पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला आहे.
पाहुयात कुठल्या पक्षाला किती जागा?
राष्ट्रवादी काँग्रेस – 5
काँग्रेस – 2
भाजप – 2
वंचित बहुजन आघाडी – 2
शिवसेना – 1
जनविकास आघाडी – 1
अपक्ष – 1
एकूण जागा – 14
जिल्हा परिषदेची 52 सदस्य संख्या आहे. या पोटनिवडणुकीमुळं सद्यस्थितीत झालेलं पक्षीय संख्या बळ खालीलप्रमाणे
भाजप – 7
शिवसेना – 6
काँग्रेस – 11
राष्ट्रवादी – 14
वंचित बहुजन आघाडी – 6
जनविकास – 6
स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1
अपक्ष – 1
या पोटनिवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी
1) शिवसेना – सुरेश मापारी, उकळी पेन गट
2) काँग्रेस – वैभव सरनाईक, कवठा गट
3) काँग्रेस – संध्या ताई देशमुख, काटा गट
4) वंचित – वैशाली लळे, भामदेवी गट
5) वंचित -लक्ष्मी लहाने, पांघरी नवघरे गट
6)राष्ट्रवादी – चंद्रकांत ठाकरे, आसेगाव गट
7) राष्ट्रवादी- अमित खडसे, भर जहागीर गट
8) राष्ट्रवादी – सुनीता कठोळे, कंझरा गट
9) राष्ट्रवादी – राजेश राठोड, दाभा गट
10) राष्ट्रवादी -शोभा गावंडे, तळप गट
11) भाजप – उमेश ठाकरे, कुपटा सर्कल
12) भाजप – सुरेखा चव्हाण, फुल उमरी गट
13) अपक्ष – स्वरस्वती चौधरी, पार्डी गट
14) जनविकास आघाडी – पूजा भुतेकर, गोभणी गट
यापूर्वी गेल्या निवडणुकीतही वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक जागा होत्या. त्यानंतर या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 जागा, काँग्रेसच्या दोन जागा आणि शिवसेनेची 1 अशा एकूण 8 जागा मविआकडे आहेत. 14 जागांपैकी 8 जागांवर मविआने विजय मिळवल्याने वाशिम जिल्हा परिषदेवर सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्या नंतर वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 जागा रिक्त झाल्या यामध्ये….
वंचित 4
राष्ट्रवादी काँग्रेस 3
भाजपा 2
जनविकास आघाडी 2,
काँग्रेस 1
शिवसेना 1
अपक्ष 1
या 14 जागा रिक्त झाल्यानं वाशिम जिल्हा परिषदेमध्ये सर्व पक्षांचं उरलेलं एकूण संख्या बळ खालीलप्रमाणे होतं
राष्ट्रवादी 9
काँग्रेस 9
शिवसेना 5
भाजपा 5
जनविकास आघाडी 5
वंचित 4
स्वाभिमानी 1
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206