Home बुलडाणा बायकोला नवऱ्यावर राग आला अन ,विपरितच घडलं ???

बायकोला नवऱ्यावर राग आला अन ,विपरितच घडलं ???

1096

 

पत्नी वर गुन्हा दाखल ,

अमीन शाह

बुलडाणा ,

पती पत्नीचा प्रेम हा अतूट असतं मात्र या नात्यात कधी कधी वाद विवाद ही होत असत पती ने पत्नी ला मारहाण केली छळ केला हे आम्ही नेहमीच ऐकत असतो मात्र इथे उलटाच झालं पैसे खर्ची घातले म्हणून नवरा बायकोचा वाद विकोपाला गेला व रागाच्या भरात पत्नीने पतीला लाकडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले . ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरात समता कॉलनी येथे बुधवारी , ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली आहे सदर मारहाणीत पतीच्या डोक्याला व हातापायाला गंभीर मार लागला असून , त्याला उपचारासाठी जालना येथे हलविले . पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे ,
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार , सोनी विनय पाल व विनय माशमसिंग पाल दोघे पती – पत्नी समता कॉलनी येथे राहतात त्यांच्यात प्रेम ही होता मात्र बुधवारी सायंकाळी दोघात पैसे खर्च केल्याचे कारणावरून वाद झाला यावेळी शेजाऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला मात्र रागाच्या भरात पत्नीने पतीला लाकडाने डोक्यावर , दोन्ही पायावर व दोन्ही हातावर जबर मारहाण केली . सदर मारहाणीत दोन्ही हात पायाच्या नळण्या फुटून व डोक्याला जबर मार लागून रक्त निघाले पती रक्तबंबाळ झाला पती रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे पाहून काहींनी ही माहिती पोलिसांना दिली मारहाणीची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी अम्बुलन्स द्वारे गंभीर जखमी पती विनय पाल यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . याबाबत विनय माशमसिंग पाल वय २ ९ राहणार लालबांद्रा तालुका पटियाला ( उत्तर प्रदेश ) हल्ली मुक्काम समता कॉलनी देऊळगावराजा यांच्या फिर्याद व मेडिकल रिपोर्ट वरून पोलिसांनी पत्नी विरुद्ध पतीला मारहाण करून जखमी केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे ,

फोटो सौजन्य , गुगल ,