Home मराठवाडा वंचित’ आघाडीने पुकारलेल्या बंदला समर्थन देत वाई बाजार मध्ये कडकडीत बंद….

वंचित’ आघाडीने पुकारलेल्या बंदला समर्थन देत वाई बाजार मध्ये कडकडीत बंद….

157

मजहर शेख

तहसीलदारांना निवेदन देवून केंद्र सरकारचा केला निषेध…

नांदेड / माहूर , दि. २५ :- देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना जाचक विधेयके जनतेवर लादण्यात धन्यता मानत असलेल्या केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात वंचित आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला प्रतिसाद देत वाई बाजार मध्ये आज दिवसभर कडकडीत बंद पाळून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.
अनेक महत्वपुर्ण प्रश्न प्रलंबित असताना देशात एनआरसी, सीेएए व एनपीआर सारखी विधेयके जवनतेवर लादून जनतेत अराजकता माजवण्याचा गंभीर आरोप केंद्र सरकारवर लावून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांनी आज दि.२४ जानेवारी रोजी या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. याला माहूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, टिपू सुलतान संघटना, संविधान बचाव संघर्ष समिती, भिम टायगर सेनेसह अनेक राजकीय पक्ष, राजकीय संघटना व सामाजिक संघटनानी जाहीर पाठींबा दिला होता. दरम्यान वंचित बहुजन आघाडी तालुका माहूर चे तालुका अध्यक्ष सुरेश आत्राम यांच्या नेतृत्वात माहूरसह तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या वाई बाजार मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यात व्यापारी बांधवांनी स्वयंस्फुर्तीने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. नियोजित बंद ला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये व लोकशाही पध्दतीनेच निषेध व्यक्त व्हावा या हेतूने वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुरेश आत्राम यांच्यासह वाई बाजार सर्कल प्रमुख सुशील रणवीर, अनाथपिंडीक कंधारे, शैलेश पारधे, अमजद खान हैदर खान पठाण, विजय खडसे, आकाश पारधेे, विशाल पारधे, अजय खडसे तसेच टिपू सुलतान संघटना वाई, परिवर्तनवादी विचारमंच वाई व कार्यकर्त्यांनी महत्वाची भुमिका बजावली. दरम्यान माहूरचे तहसीलदार सिध्देश्वर वरनगावकर यांच्यामार्फत मा. जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले. यावेेेेळी वंचित आघाडीच्या पदाधिका-यांसह माहूर न.पं.चे माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादीचेे तालुका अध्यक्ष तथा माहूर येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मेघराज जाधव, नगरसेवक दिपक कांबळे, सिध्दार्थ तामगाडगे, अविनाश टनमने, देवानंद कांबळे व अनेक पक्ष, संघटना व पदाधिका-यांची उपस्थिती होती.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक संजय चव्हाण, एएसआय पठाण, एनपीसी दारासिंग चौहाण, पोहेकॉ. हेमंत मडावी व पोलीस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला…