मजहर शेख,नांदेड
नांदेड/माहूर,दि : ९ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतापगड पायथ्याशी अफजलखान भेटीदरम्यान जीवाची बाजी लावून शिवरायांचे प्राण वाचविणारे अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांची ३५६ वी जयंती भारतीय जनता पक्षाच्या वतीने श्रीक्षेत्र माहुरगड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड यांनी प्रतिमेचे पुजन करून आदरांजली वाहली तसेच त्यांनी शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला यावेळी शहराध्यक्ष गोपू महामुने, जेष्ठ नेते अनिल वाघमारे यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पञकार प्रकोष्ट जिल्हाध्यक्षा सौ. पद्माताई गिऱ्हे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजू दराडे,जीवन अग्रवाल,महाराष्ट्र नाभिक संघटनेचे बाळूमामा शिंदे, बाबाराव चिल्लेकर, विलास राऊत,नवीन राऊत, प्रविण झामरे, अरविंद दवणे, राहुल राऊत,
बालाजी राऊत, वैभव राऊत, चेतन शिंदे, अजय राऊत, संजय पेंदोर, संतोष तामखाने, अर्जुन मोहिते आदिंची उपस्थिती होती.