Home बुलडाणा स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ ॲपच्या माध्यमातुन जिल्हावासीयांनी प्रतिक्रिया नोंदवाव्यात

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ ॲपच्या माध्यमातुन जिल्हावासीयांनी प्रतिक्रिया नोंदवाव्यात

127

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांचे आवाहन

फुलचंद भगत

वाशिम:-स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण मध्ये जिल्ह्याला नामांकण मिळविण्यासाठी जिल्हावासियांनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मोबाईल ॲपच्या माध्यमातुन प्रतिक्रिया नोदवाव्यात, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम यांनी केले आहे.

जिल्ह्यात स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात कामे झाली असुन आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनाबाबत गाव निहाय स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत कामे सुरु करण्यात आली आहेत. आपण जिल्ह्यात स्वच्छतेच्या बाबीत केलेल्या कामाचे मुल्यांकण स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 अंतर्गत होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचा सहभाग असुन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे उदा. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, बाजाराची ठिकाणे या ठिकाणची स्वच्छतेसंदर्भातील सध्यस्थितीची पडताळणी होणार असुन, या पडताळणीच्या माध्यमातुन जिल्ह्याला 300 पैकी गुण देण्यात येणार आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामिण अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मध्ये नागरीकांचा सहभाग नोंदविण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर SSG21 हे ॲप सुरु करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातुन गावातील सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता सुविधा यावरील प्रश्नाची उत्तरे ग्रामस्थांना द्यावयाची आहेत. ग्रामस्थांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदविलेल्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून जिल्ह्याला 350 पैकी गुण मिळणार आहेत.

जिल्हावासियांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपले मत नोंदवुन जिल्ह्याला स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2021 मध्ये पुन्हा एकदा स्वच्छतेच्या क्षेत्रात अग्रेसर ठेवावे, असे आवाहन जि.प. चे प्रभारी सीईओ सुनिल निकम यांनी केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206