सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार
पंचायत समिती देवळी येथे आढावा बैठक.
वर्धा , दि. २५ :- जिल्ह्यातील देवळी-पुलगाव मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे माजी स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन यांची देवळी तालुक्यातील पंचायत समिती सभागृहात पाणी टंचाई कृती आराखडा सभा पार पडली.
गाव निहाय पाणी टंचाई चा आढावा यावेळी घेण्यात आला. गावांसाठी गावं पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी व गावाला भरपूर पाणी उपलब्ध होण्यासाठी आणि उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून काही उपाय योजना करण्याच्या दृष्टीने ही सभा बोलावली होती. तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत गावातील सरपंच व सचिव यांचा आढावा घेण्यात आला. पाणी पुरवठा विभागाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत राहावी या साठी उपाययोजना करून अंमलबजावणी होण्यासाठी निर्देश देण्यात आले. सरपंच्याच्या समस्या समजून घेऊन तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गावस्तरावर आलेल्या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी असेही निर्देश देण्यात आले. नवीन पाणी पुरवठा विहीर बांधणे, विहीर खोलीकरण, लोकवस्ती नुसार पाण्याचे स्रोत तयार करणे, नविन पाईपलाईन टाकणे अश्या अनेक प्रकारच्या कामाची मागणी लक्षात घेवून प्रस्ताव तयार करण्याकरिता कार्यवाही करावी अश्या सूचना देण्यात आल्या.
पंचायत समिती देवळी च्या सभागृहात पार पडलेल्या संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा सभेचे अध्यक्ष आमदार रणजित कांबळे होते .
तर जिल्हा परिषदेच्या सदस्या वैशालीताई येरावार, पंचायत समिती सभापती कुसुमताई चौधरी, उपसभापती युवराज खडतकर, माझी पंचायत समिती सभापती विद्याताई भुजाडे, पंचायत समिती सदस्य दिलिप अग्रवाल, अशोक इंगळे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता राऊत, तहसीलदार राजेश सरोदे आणि गटविकास अधिकारी मनोहर बारापत्रे व पि. व्ही. गायगोले इत्यादी पदाधिकारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या सभेमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले तर नागपूर यवतमाळ हायवे रोडच्या कामामुळे अनेक पाईपलाईन फुटल्या त्यावर रोड चे काम करणाऱ्या कंपनीवर कार्यवाही करण्याची मागणी सरपंच यांच्या वतीने करण्यात आली. आमदारांनी या सभे मध्ये अपूर्ण कामाचा आढावा घेऊन दोषींवर कार्यवाही केली जाईल असे ठणकावून सांगितले. त्याच बरोबर गावाचा विकास करणारा सरपंच यांच्या समश्या तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोडविण्यासाठी हयगय करु नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तालुक्यातील पंचायत समिती लोकप्रतिनिधी, सरपंच आणि सर्व विभागाचे विभाग प्रमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. धमाणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय खोपडे, कृषी अधिकारी प्रशांत भोयर, गटशिक्षणाधिकारी सतीश आत्राम, विस्तार अधिकारी वासुदेवझाडे,अभियंता दौलतकर, प्रमोद सातपुते, अधीक्षक शिरपूरकर, विस्तार अधिकारी उखळकर, राठोड, मरस्कोल्हे इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभेचे संचालन विस्तार अधिकारी ढोणे यांनी केले तर प्रास्ताविक गटविकास अधिकारी बारापात्रे यांनी केले तर सभापती कुसुमताई चौधरी यांच्यावतीने समारोप करण्यात सभेचा आला.