मजहर शेख,नांदेड
नांदेड/माहूर,दी : २० :- मागील तीन वर्षापासून द पॉवर आॅफ मिडियाच्या माध्यमातून माहूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी पोहचवीण्यासाठी सदा अग्रेसर असलेली द पाॅवर आॅफ मिडीयाची नवीन नियुक्ती संदर्भात महत्वपूर्ण बैठक अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांच्या अध्यक्षतेत व मराठवाडा विभागीय प्रमूख वसंत कपाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 19 आॅक्टोबर 2021 रोजी सायं. पाच वा.स्थानिक बालाजी मंगल येथे पार पडली.
या बैठकीत तालुकाध्यक्ष विजय दत्तात्रेय आमले यांची सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली.यावेळी जेष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी,कार्तिक बेहेरे, प्रशांत शिंदे, सुरेश गिऱ्हे,पवन कोंडे,संजय घोगरे, संजय पेंदोर,राम दातीर, राजू दराडे,शेख मजहर, फिरोज पठाण,संजय सुरोशे,विनोद भारती, सचिन बेहेरे, अपील बेलखोडे,जयंत गिर्हे,महीला पत्रकार पद्माताई गिऱ्हे,नितीन तोडसाम,गणेश चव्हाण यांची उपस्थिती होती.