Home नांदेड महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन किनवट तालुका कार्यकारणी जाहीर

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशियन किनवट तालुका कार्यकारणी जाहीर

437

मजहर शेख,नांदेड

नांदेड/किनवट,दी : २० :- पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक रविभाऊ वैद्य मराठवाडा उपाध्यक्ष शकील भाऊ जिल्हा अध्यक्ष सलीम पठाण यांच्या मार्गदर्शनाने महिला जिल्हाध्यक्षा पद् मा गि-हे व तालुका अध्यक्ष परवीन शेख यांच्या अथक परिश्रमाने पोलीस बॉईज असोसिएशन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. पोलीस बॉईज असोसिएशन ही संघटना पोलिसांसाठी व जिथे अन्याय तिथे हजर असते पोलिसांच्या मुलांना 5%आरक्षण मिळवून देण्यामध्ये या संस्थेला यश आलेला आहे तसेच संघटना सर्वतोपरी पोलीस मित्रांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी कार्यरत आहे पूर्ण महाराष्ट्र मध्ये पोलीस बॉईज असोसिएशन चे कार्य करत आहेत संघटनेचे सर्वतोपरी संस्थापक अध्यक्ष रवी भाऊ वैद्य यांच्या अथक परिश्रमाने पोलिसांच्या मुलांना 5%आरक्षण मिळवून देण्यामध्ये या संघटनेला खूप चांगल्या प्रकारे यश मिळाले आहे. पोलीस बॉईज असोसिएशनची किनवट येथील कार्यकारणी नवीन जाहीर करत असताना.यावेळी माहूर किनवट मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आ.श्रीमान भीमरावजी केराम साहेब व तसेच बीड जमादार सुनील काल बुद्धे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र याच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले. यावेळी तालुका उपाध्यक्ष शशिकला तलांडे, आशाताई कदम तालुका सचिव पदी जयश्री भरणे, सहसचिव रजिया शेख नाजिमोदिन ,कार्याध्यक्षपदी गंगुताई परेकार यांना , संघटक, मनीषा चौधरी सहसंघटक ,विमलबाई पांडे कोषाध्यक्ष कविता गोणारकर, सहकोषाध्यक्ष वंदना गादेकर,नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी सूत्र संचालन जयश्री भरणे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष प्रवीण शेख यांनी मानले