Home बुलडाणा पत्रकार तंजिम हुसेन यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार.

पत्रकार तंजिम हुसेन यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार.

267

मागील 10 वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेऊन आदिल शाह फारुकी बहुउद्देशीय संस्था जळगाव खानदेश यांनी पुरस्कार जाहीर केला.
चिखली , सैय्यद तौसीफ
चिखली येथील प्राध्यापक तंजिम हुसेन यांनी शिक्षण,विधी,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात मागील 10 वर्षा पासून आपले योगदान देत आहेत यावर जळगाव खानदेश येथील आदिल शाह फारुकी बहुद्देशीय संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देण्याची घोषणा एका पत्राद्वारे केली.
चिखली येथील प्राध्यापक तंजिम हुसेन यांनी मागील 10 वर्षा पासून विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये काम केले यावर त्यांच्या कामाची दखल ही जळगाव खानदेश येथील आदिल शाह फारुकी बहुद्देशीय संस्था यांनी घेऊन त्यांना मानाचा असा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2021 जाहीर केला हा पुरस्कार त्यांना जळगांव खानदेश येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे त्यांना पुरस्कार जाहीर होताच शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.