Home नांदेड नांदेड – तहसीलदार डॉ. मृणाल जाधव फिरले सारखणीच्या बाजारपेठेत ; दुकानात जाऊन...

नांदेड – तहसीलदार डॉ. मृणाल जाधव फिरले सारखणीच्या बाजारपेठेत ; दुकानात जाऊन केली विचारणा कोरोना लस घेतली काय ?

419

25 ऑक्टोबर 2021 रोजी व्यापाऱ्यासाठी लसीकरण शिबीर चे आयोजन.

सारखणी बाजारपेठेत फिरून कोरोना लसीकरण घेण्याच्या दिल्या सुचना .

प्रतिनिधी – मजहर शेख,नांदेड

नांदेड/सारखणी, दि : २४ :- किनवट तालुक्यातील सारखणी येथे दिनांक 23 रोजी किनवट चे तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी सारखणी बाजारपेठेतील अनेक दुकानात जाऊन कोरोना लस घेतली का ? याची चौकशी करून प्रत्येकांना सूचना दिल्या.प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन करून ज्याने दोन लस घेतली असेल त्यांना दुकान चालवण्यासाठी परवानगी अन्यथा दुकान बंद करण्यात येणार .त्यासाठी दिनांक 25 ऑक्टोबर 2021सोमवार रोजी व्यापाऱ्यासाठी लसीकरण शिबीर ठेवण्यात आल्याची माहिती या वेळी सांगितले.
सारखणी गावात लसीकरणाच्या टक्केवारीत लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात कमी लसीकरण असल्याचे मिशन कवच-कुंडल अंतर्गत 75 तास विशेष लसीकरण बाबत तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी सारखनी व्यापारपेठ पिंजून काढून सर्व व्यापाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ.बिपीन इटनकर व जिल्हा परिषद मुख्य मुख्याधिकारी डॉ.वर्षा ठाकूर -घुघे यांच्या संकल्पनेतून मिशन कवच-कुंडल लसीकरण मोहीमेला यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे .आपले लसीकरण पूर्ण करून स्वतः चे व इतरांचे कोविड आजारापासून संरक्षण करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीन करण्यात येत आहे.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तीकरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी उपक्रम राबविण्याच्या दृष्टिकोनातून युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. यावेळी तहसीलदार मॅडम डॉ. मृणाल जाधव यांनी प्रा.आ. उपकेंद्र लसीकरण सेंटरला भेट दिली ,या प्रसंगी सरपंच वनमाला तोडसाम यांनी प्रथम भेट म्हणून तहसीलदार मृणाल जाधव त्यांचा शालश्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य सेविका श्रीमती कमटलवार ,यशोदा मडावी आणी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर,तशेच तलाठी कदम, ग्रामसेवक संतोष ताडेवार,उपसरपंच अंकुश जाधव,लक्ष्मण मिसेवार, बाबुसेठ, डॉ. रामराम राठोड,रशिद फाजलानी, आदींची उपस्थिती होती.