Home रायगड कधी करणार बंद लेडीज बार महिलांना खावा लागतोय विनाकारण मार….

कधी करणार बंद लेडीज बार महिलांना खावा लागतोय विनाकारण मार….

204

पनवेल –  महिलांसाठी त्रासदायक ठरत असलेले पनवेल तालुक्यातील लेडीज कम डान्सबार बंद करण्याबाबत पत्राद्वारे केली मागणी.
कोरोना प्रादुर्भावात असंख्य परिवाराने आपले घरातील नातेवाईक व कर्ते पुरुष यांना गमावले त्यानंतर त्यांच्यावर आर्थिकी परिस्थितीचे संकट उभे राहिले आहे त्यातच काही महिलांच्या घरातील धडधाकट मुले हे बार जुगार लॉटरी यांच्या विळख्यात अडकले आहेत. पनवेलसारख्या शहराच्या आजूबाजूला व शहरात असणाऱ्या लेडीज बार मालकांनी पुन्हा प्रशासनाला हाताशी धरून आपले बार सुरु केले आहेत. सुरक्षित वावरासह लेडीज बारचे अन्य नियमांचे पालन न करणाऱ्या अनेक बारवर या महिन्यामध्ये कारवाई झाल्या असल्यातरी इतक्या दिवस या लेडीज बारना अभय का दिले असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका व्यक्त होत आहे. एकीकडे नियमांचे उल्लंघन झाल्यास सर्वसामान्यांवर पनवेल महापालिका व स्थानिक पोलीस प्रशासनाकडून तातडीने कारवाईचा बडगा उगारला जातो. दुसरीकडे राजरोसपणे नियमांना तिलांजली देणाऱ्या बारवर वेळीच कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हॉटेल आणि डान्स बार रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असतानाही त्या आदेशाला केराची टोपली दाखवत परिसरातील बहुतेक डान्स बार हे रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा हॉटेल आणि बार विरोधात पोलिसांसह पनवेल महानगरपालिकेने कारवाई करून यांच्यामुळे वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवावा. दुकाने, हॉटेल, बार आणि पब, हुक्का पार्लर आदी रात्री १२ वाजल्यानंतर सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे असे असतानाही शहरातील अनेक हॉटेल, डान्स बार, पब, हुक्का पार्लर हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा अस्थापनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक सुद्धा कार्यरत असून त्यांनी नुकतेच पनवेल व तळोजा परिसरात अशा प्रकारच्या डान्सबार वर कारवाई केली आहे, असे असतानाही स्थानिक पोलिसांच्या साथीने अनेक हॉटेल व लेडीजबार हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कित्येक ठिकाणी बारच्या मुख्य दरवाजाची लाईट घालवून मागील दरवाज्याच्या बाजूने हे बार सुरू असतात. छरंतु अशा ठिकाणी कारवाईला अर्थपूर्ण बगल दिली जात असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. मुख्यत्वे करून कोरोना विषाणूचे सर्वाधिक उल्लंघन अशा प्रकारच्या बार, पब व हुक्का पार्लरमध्ये होत आहे. या ठिकाणी वेळेचे बंधन पाळले जात नाही तरी नियम धाब्यावर बसवून अशा रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या बार, पब आणि हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई करावी तसेच नागरिकांना नको असलेले व संसार उध्वस्त करणारे लेडीज बार हे शासनाने बंद करावे अशी मागणी करीत असून याबाबत गांभीर्याने न घेतल्यास आम्ही सर्व महिला आक्रमक होऊन एक वेगळे जनआंदोलन उभारू याची आपण कृपया नोंद घ्यावी.