Home विदर्भ युवा लॉयन्स ग्रुपचे आत्मक्लेश समाधी आंदोलन

युवा लॉयन्स ग्रुपचे आत्मक्लेश समाधी आंदोलन

117

प्रतिनिधी -: धनराज खर्चान

अमरावती / भातकुली -:युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट राज्य यांच्या वतीने व युवा लायन्स ग्रुपचे सस्थापक अध्यक्ष योगेश गुडधे यांच्या अध्यक्षतेखाली आत्मक्लेश समाधी आंदोलन दि २७आक्टोबर रोजी दुपारला १२ वाजता अमरावती भातकुली मार्गावरील गौरखेडा फाटा येथे आयोजित करण्यात आले त्या प्रसंगी त्यांच्या प्रमुख मागण्या -: भातकुली तालुक्यातील शेतकर्याना दिवाळीच्या पहिले २०२०ते २१ सरसकट पीक विमा व नुकसान भरपाई मिळाली पाहिजे .निम्न पेढी प्रकल्पाअंतर्गत दाब युक्त बंदीस्त नलिका वितरण प्रणालीचे काम ज्या शेतकऱ्याचा मालकीच्या जमिनीतून होत आहेत्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी २लाखाची मदत मिळावी.निम्न पेढी प्रकल्पाचा सर्वात मोठा धोका प्रकल्पाच्या अगदी १००मीटर असण्याऱ्या निंभा , कृष्णापुर , नारायापुर , शिवापूर ,वासेवाडी ,या गावांना असून शासनाने तातडीने या गावाचे पुनर्वसन करावे. निम्न पेढी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात झालेल्या नित्कृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून S.M.S.इन्फ्रास्ट्क्चर ,वD ठक्कर या दोषी कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करावी या प्रमुख मागण्या घेऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आत्मक्लेश समाधी आंदोलनात सहभागी झाले होते , सरकार व प्रशासणाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली व जो पर्यत आमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा प्रशासन लेखी स्वरूपात मागण्या मान्य करत नाही तो पर्यत आमचे आंदोलन सुरू राहणार असे युवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष योगेश गुडधे यांनी म्हणणे होते त्यानंतर तहसिलदार, जलसंपदा कार्यकारी अभियंता व कृषी अधिकारी यांनी योगेश गुडधे सोबत चर्चा करून त्याच्या चारही मागण्या लेखी स्वरूपात मान्य करत आत्मक्लेश समाधी आंदोलन मागे घेण्यात आले.मागील १४ वर्षांपासून पेढी प्रकल्पातील मागण्या ह्या प्रलंबित आहेत यावरून शासन व प्रशासन किती बेजबाबदार आहे हे सिद्ध होतय काही अधिकारी तर कॅमेरा समोर बोलण्यास सुद्धा नकार देतात त्यामुळे पेढी प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय असे मत युवा लॉयन्स अध्यक्ष योगेश गुडधे यांनी व्यक्त केले, यावेळी या आत्मक्लेश समाधी आंदोलन मध्ये महिलाचा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होता व त्यांनी आपल्या दुःखी भावना बोलताना काही महिलांना तर अश्रू अनावर सुद्धा झाले होते ,आतातरी शासन प्रशासनाला जाग येईल का? कि सरकार आणखी किती नागरिकांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार असा प्रश्र उपश्रित होते