कायदेशीर कारवाईसाठी भिमटायगर सेनेचे प्रशासनाला निवेदन
फुलचंद भगत
वाशिम:-ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथील कर्मचारी गैरहजर असतांना त्यांचे पगार काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन सबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भिमटायगर सेनेने प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे.
ग्रामीण रुग्णालय मालेगाव येथील एक स्टाफ नर्स दिनांक ९ जून २०१९ पासून ३१ जाने २० पर्यंत गैरहजर होत्या. आणि त्यानंतर फेब्रुवारी २०२० पासून ३०
सप्टेंबर२०२० पर्यंत प्रसूती रजेवर होत्या असे दाखवण्यात आले आहे. परंतु प्रसूती रजा हि नियमाप्रमाणे ६ महिने असते.परंतु असे असतांनाही सबंधित नर्सची ८ महिन्याची प्रसूती रजा दाखवून त्यामध्ये सुद्धा गैरप्रकार केला आहे. त्यानंतर सुद्धा १० डिसेंबर २०२० ते ३१ जानेवारी २०२१ पर्यंत सदर स्टाफ नर्स हि गैरहजर असून सुधा त्या नर्स चा पगार ग्रामीण रुग्णालय, मालेगाव येथील
वैद्याकीय अधीक्षक व लेखापाल तसेच जिल्हा स्तरावरील लेखापाल यांनी संगनमत करून मोठ्या प्रमाणावर शासनाची दिशाभूल करून आर्थिक गैर प्रकार केला असल्याचा आरोप भिमटायगर सेनेने लेखी निवेदन जिल्हाधिकार्यासह सर्व वरिष्ठांना सादर केले आहे आणी वरील गैरप्रकार करण्यार्या अधिकारी व कर्मचारी याची चौकशी करून त्यांना सेवेतून तत्काळ निलंबित करावेत.अन्यथा भीम टायगर सेना वाशीम च्या वतीने तीव्र आदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाव्दारे दिला आहे.सोबत- सदर कर्मचारी हे गैरहजर असल्या बाबत चे पुरावा असलेले कागदपत्रेही प्रशासनाला पाठवले असल्याचे संघटनेकडुन समजले आहे.यावर वरिष्ठ प्रशासन सबंधितांवर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206