मजहर शेख,नांदेड
नांदेड/किनवट : तालुक्यातील गोकुंदा येथील 33 के.व्ही.केंद्रामध्ये 10 एम.व्ही.ए. क्षमतेचे 2 ट्रान्सर्फामर बसवावेत, व शेतकरी, कुटीर उद्योजक, विजग्राहक नागरीकांची नियमित विजपुवठा अभावी होत असलेली गैरसोय व आर्थिक नुकसान तात्काळ थांबवावे, अशी मागणी दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड यांनी महावितरण मंडळ कार्यालय, नांदेडचे अधिक्षक अभियंता यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात असे नमूद केले की, गोकुंदा व किनवट शहर आणि ग्रामिण भागातील विज ग्राहकांना वारंवार विजपुरवठा खंडित होत असल्यामुळे भयंकर त्रास व आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे . ही समस्या कायमस्वरुपी दुर करण्यासाठी आपण योग्यती कार्यवाही करुन शेतकरी व विजग्राहक नागरीकांची व सर्वसामान्य जनतेची गैरसोय दुर करावी.
मागील साधारणत: 30-40 वर्षापुर्वी किनवट शहर व गोकुंदा ग्रामपंचायत व परिसरातील विजपंपधारक कास्तकारांची, विजेवर आधारित व्यवसायिकांची संख्या कमीच होती. त्यानुषंगाने तत्कालीन विद्युत महामंडळाने गरजेच्या तुलनेत 33 केव्ही केंद्र् गोकुंदा येथे विजपुरवठ्याची आवयशक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करुन विजवितरणाची योग्य व्यवस्था केली होती, परंतु आज ग्राहक 4 पट वाढले. तथापि विजपुरवठा विजवितरण व्यवस्थेत व यंत्रसामुग्रीत वाढीव उपलब्धता इतर अंतर्गत व बाह्य बदल झालेला नाही.
सर्व व्यवहार संगणकीय सुव्यस्थित आणि वेळेच्या वेळी पारपाडण्यासाठी 24 तास सुरळीत विजुपरवठा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
जुनाट विद्युतवाहक ॲलुमिनियमच्या तारा, जुने खांब, जुन्याच डी.पी. हे सगळं मोडकळीस आलं आहे. या तारा तर, हवेच्या झुळकेनीही जागोजागी तटातट तुटून पडत असल्याने दिवसातुन अनेकदा कर्मचाऱ्यांना नाईलाजाने विजपुरवठा बंद करावा लागतो.
लोकांचा विजवितरण कंपनीच्या विरुध्द प्रक्षोभ दिवसेंदिवस वाढत चालेला आहे. शेवटी सुचना वजा विनंती म्हणुन कळविण्यात येते की, आपण सध्या गोकुंदा येथील 33 केव्ही केंद्रामध्ये 5 केव्हीच्या 2 पावर ट्रान्सर्फामर आहेत तथील 1 किनवट व 1 गोकुंदा व ग्रामिण भागासाठी सध्या जी वितरण व्यवस्था आहे. त्या ठिकाणी 10 एम.व्ही.ए. चे 2 पावर ट्रान्सर्फामर बसवावे, 35 वर्षापुर्वीच्या कुजलेल्या विजवाहतुक तारा बदलुन नविन टाकाव्यात. जुने मोडकळीस आलेले खांब बदलावे व कार्यालयातील आपुरा कर्मचारी वर्ग वाढवावा, या बाबी केल्या शिवाय आम्हा लोकांची विजेची गरज भागणार नाही.
आपण सहानुभूतीपुवर्क या गंभिर बाबीचा विचार करुन आम्हा त्रस्त विजग्राहक मंडळी व नागरीकांच्या प्रती अनुकंपा दाखवावी. अन्यथा नाईलाजाने शिससेना पक्षातर्फे नगरिकास सोबत आपल्या किनवट येथील उपविभागीय कार्यालयास टाळे ठोकुन,अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेराव घालुन शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिशा समिती सदस्य मारोती कानबाजी सुंकलवाड यांनी दिला आहे.