मजहर शेख, नांदेड
नांदेड,दि : २९ :- किनवट येथून जवळच असलेल्या गोकुंद्यात “मिशन कवचकुंडल” अंतर्गत विशेष लसीकरण मोहिमेने गती घेतली असून पेटकुलेनगरमध्ये लावलेल्या कॅम्पमध्ये लस घेण्यास लोकांनी रांगा लावल्याचं चित्र दिसत होतं.
जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांच्या संकल्पनेतील “मिशन कवचकुंडल” अंतर्गत विशेष लसीकरण मोहीम सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. मृणाल जाधव व गटविकास अधिकारी सुभाष धनवे यांच्या नेतृत्वात तालुक्यात राबविण्यात येत आहे. वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने व बाल विकास प्रकल्पाधिकारी आश्विनी ठकरोड हे लसीकरण पूर्णत्वास नेण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.
गोकुंद्यातील पेटकुले नगर येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा न्याय परिषदेच्या सहकार्याने लसीकरण कॅम्प लावण्यात आला होता. येथे हबीब कॉलनी, दत्तनगर व पेटकुले नगर येथील रहिवाशांनी लस घेतली. विशेषतः हा मुस्लिम बहुल भाग असल्याने येथे गृहभेटी घेऊन जनजागृती केल्यामुळे 75% मुस्लिम महिलांनी लस घेतली या केंद्रावर आरोग्य सहाय्यक चंद्रकांत कोमलवाड व आरोग्य सेविका वंदना मेश्राम -उईके यांनी लसीकरण केले. अंगणवाडी सेविका सपना गायकवाड, गंगासागर मुखाडे, सावित्रा झळके, पद्मा बटूर व अनुसया नवसागरे यांनी लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा न्यायिक परिषदेचे तालुकाध्यक्ष फेरोज शेख, महिला तालुकाध्यक्षा तथा अंगणवाडी सेविका कविता गोणारकर व सदस्या विमल पांडे यांनी घरोघर जाऊन महिलांना लस घेण्यास प्रवृत्त केले. त्यामुळे एकाच दिवशी येथे 102 व्यक्तींनी लस घेतली.