Home बुलडाणा शासनाच्या आनुदानाला वाचनाल्याकडून चुना अनुदान लाटण्या पुरते राहिले “वाचनालय”

शासनाच्या आनुदानाला वाचनाल्याकडून चुना अनुदान लाटण्या पुरते राहिले “वाचनालय”

225

रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा:- तालुक्यातील काही वाचनालये शासनाच्या लाखो रुपयांच्या अनुदानाला चुना लावत असल्याचे चित्र ग्रामीण व भागात पाहवयास मिळत आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला माहिती व्हावी म्हणून प्रत्येक गावात शासनातर्फे जनतेच्या सोयीसाठी एक विनामूल्य वाचनालय उभारण्यात आले. मात्र, काही वाचनालयांत अपुऱ्या वाचन साहित्यामुळे नागरिकांना माहिती होत नाही.
हे विशेष.वाचनालय चालविणारे फक्त अनुदान लाटण्याचे काम करीत आहेत. मात्र,बऱ्याच गावातील वाचनालयात पुस्तके नाहीत तर एक दोन वृत्तपत्र वाचायला मिळत नाही.यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा अनुदानाला चुना लागल्याचा आरोप होत आहे. त्यांची चौकशी होणे जरुरी आहे व शासनाचा पैसा वाचला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.