पत्नी पाठोपाठ पती ही गेलं ,
अमीन शाह ,
पत्नीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची वार्ता कळताच पतीनेही राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली . ही घटना जळगाव येथील रामेश्वर कॉलनीत आज सकाळी उघडकीस आली . या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली . अरुण खंडू सोनवणे ( 47 , रा.लाडली , ता . धरणगाव , ह.मु.नागसेन नगर , रामेश्वर कॉलनी , जळगाव ) असे मयताचे नाव आहे . पत्नीच्या मृत्यूचा आघात सहन झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा समजलेल्या माहितीनुसार , अरुण सोनवणे हे पत्नी मीराबाई आणि मुलगा अनिकेत यांच्यासह राहतात . ते जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते . गेल्या काही महिन्यांपासून त्यांची पत्नी मिराबाई सोनवणे ह्या दुर्धर आजार जडला होता . त्यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते . त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत होता . रविवार , 31 नोव्हेंबर रोजी मीराबाई सोनवणे यांचा मुंबईत खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला . त्यावेळी अरूण सोनवणे हे जळगावात राहत्या घरी एकटेच होते . सोमवारी सकाळी मीराबाई सोनवणे यांचा मृतदेह मुंबईहून येत असल्याने अरुण सोनवणे यांचे लहान भाऊ सुनील सोनवणे हे घरात सावरा- सावर करण्यासाठी सोमवार , 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता अरुण सोनवणे यांच्या घरी गेले . त्यावेळी त्यांचा घरात दरवाजा आतून बंद होता . सुनील यांनी घरात दरवाजा तोडला असता मोठा भाऊ अरुण सोनवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे दिसून आले दरमियांन पत्नी गेल्याचे दुःख त्यांना सहन न झाल्या मुले त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलल्या जात आहे या प्रकरणी . एमआयडीसी पोलिसानी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मृतक चा भाऊ सुनील सोनवणे व इतरांनी तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अरुण सोनवणे यांना हलवले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले . मयत अरुण सोनवणे यांच्या पश्चात आई सरुबाई , वडील खंडू सोनवणे , तीन भाऊ , सपना आणि अर्चना दोन विवाहित मुली आणि मुलगा अनिकेत असा परीवार आहे . याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली या घटने मुळे सोनवणे कुटूंबीयावर दुःखाचे सावट पसरले आहे ,