मजहर शेख,नांदेड
नांदेड/माहूर,दि : १ :- कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामूळे सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.कोरोना आज काही प्रमाणात नियंत्रित झाला असल्याने शासनाने ताळेबंदी शिथील केली असे असले तरी कोरोनाबाबत गाफील राहता कामा नये सध्या दिवाळी सणाच्या निमित्ताने सर्व बाजारपेठा सजल्या असून बाजारात प्रचंड प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली असून 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील बालकांनी बाजारात गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तसेच सर्वांनी स्ॅनेटायझरचा व मास्कचा वापर करून प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच लहान मुलांना फटाके फोडताना सावधानता बाळगावी असे आवाहन माहूर पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक नामदेव रीठे केले आहे.