प्रशांत नाईक – धामणगाव रेल्वे
-अमरावती जिल्ह्यातील विटाळा येथील गावठी दारुभट्टी व अवैध दारू विक्री चे अनेक गुन्हे दाखल असलेला गजानन रामदास डाहे या आरोपीवार एमपिडीए अंतर्गत कार्यवाही करून 1नोव्हेंबर पासून सहा महिन्याकरिता जिल्हा मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
अमरावती जिल्याच्या इतिहासातील दारू विक्रेत्यावर एमपिडीए अंतर्गत कार्यवाही ही पहली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्याचा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी कडे दाखल केला होता.
जिल्हा ग्रामीण अधीक्षक अविनाश बारगळ,एएसपि सातव,यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तपण कोल्हे,उपनिरीक्षक आशिष शिंदे, हे. कॅ.अमोल देशमुख, मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक सुरज तेलगोटे यांनी ही कार्यवाही केली.
अश्या कार्यवाही मुळे पोलीस प्रशासनाचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.