Home मराठवाडा कलियुगात रामायणापेक्षा शिवचरित्र आचरणाची खरी गरज- हभप गजानन महाराज आळंदीकर यांचे प्रतिपादन

कलियुगात रामायणापेक्षा शिवचरित्र आचरणाची खरी गरज- हभप गजानन महाराज आळंदीकर यांचे प्रतिपादन

241

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

त्रेतायुगात प्रभूश्रीरामचंद्र हा परमेश्वराचा अवतार आहे तर कलियुगात छत्रपती शिवाजी महाराज हे ईश्वरिय अवतार तरूणांपुढे आदर्श मानले पाहिजेत.आज रामायणापेक्षा शिवचरित्र आचरणाची खरी गरज आहे, असे प्रतिपादन हभप गजानन महाराज आळंदीकर यांनी केले.
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे, किर्तन मालेचे दुसरे पुष्प गुंफताना गजानन महाराज आळंदीकर यांनी संतांचा महिमा सांगितला.महाराज म्हणाले, ज्यांच्या अंगात शांतता आणि महानता आहे त्यांनाच संत म्हणतात.सुपुत्र जन्माला येण्यासाठी गर्भसंस्कार महत्त्वाचा आहे.लेकरं कितीही बिघडू द्या, मायबाप बिघडले नाही पाहिजे.जीवाला सन्मार्गाला लावण्याचे काम साधुसंतांनी केले.माय, माऊली,आई एकच आहेत म्हणून जडजीवाचे संत हेच ‘मायबाप’ आहेत.स्रीभ्रूण हत्या करणारा सामान्य माणूस हा मायबाप कसा असू शकतो. कोरोना हा भगवंताचा अवतार समजला पाहिजे.कोरोनाने खुप काही शिकवले.महाराज म्हणाले,गरिबाने मोठ्यांची स्तुती करून काय उपयोग,स्तुती करणारा तोडीचा असला पाहिजे.