Home विदर्भ रेल्वे कंत्राटदाराला वाचविण्यासाठी काही शासकीय अधिकार्यांची तारेवरची कसरत…. “अर्थपूर्ण संबंधाच दाट संशय”

रेल्वे कंत्राटदाराला वाचविण्यासाठी काही शासकीय अधिकार्यांची तारेवरची कसरत…. “अर्थपूर्ण संबंधाच दाट संशय”

345

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ – वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील गौनखनिज गैरप्रकाराच्या चौकशी व कारवाई दरम्यान यवतमाळ विभागातील काही शासकीय अधिकारी यांची भूमिका अतिशय संशयित आहे. रेल्वे कंत्राटदारावर कारवाई करण्याचे प्रत्येक वेळेस टाळाटाळ करुन तक्रारदाराला गोवण्यासाठी तारेवरची कसरत करतांना निदर्शनास येते आहे.

 

 

 

 

सविस्तर वृत्त असे की वर्धा – यवतमाळ – नांदेड नवनिर्मित रेल्वे उत्खननातील गौन-खनिज हे संबंधित कंत्राटदार विनापरवानगी तसेच शासनाकडे कुठलाही महसूल न भरता ईतरत्र खुल्या बाजारात विक्री करुन लाखो रुपयांची कमाई करीत आहे व शासनाचा लाखो रुपयांचा चुना लावून महसूल बुडवित आहे. अशी तक्रार पञकार अमोल कोमावार यांनी दि.२७/८/२०२० रोजी संबंधित विभागाला केली. या प्रकरणातील संपूर्ण चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय चौकशी समिती नेमली गेली. तसेच अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व कारवाई सुरू झाली व समिती मध्ये तहसिलदार यवतमाळ सुद्धा आहे त्याच बरोबर संबंधित क्षेत्र हे दोन तहसिलदार यांच्या अधीकार क्षेत्रात येत असल्याने समिती च्या अध्यक्ष यांनी कदाचीत चौकशी व कारवाईसाठी संपूर्ण प्रकरण मा. तहसिलदार यवतमाळ यांच्या कडे सुपुर्त केले.
परंतु संपूर्ण प्रकरणात रेल्वे विभाग कींवा रेल्वे कंत्राटदाराला हेतुपूर्वक डावलल्या जात असल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे. एवडेच नाही तर रेल्वे कंत्राटदाराचे नाव सुद्धा या प्रकरणात घेतलेले काही शासकीय अधिकार्यांना आवडत नाही . सदर चौकशी समितीचे सदस्य म्हणून आजपर्यंत जायमोक्यावर जाऊन स्वतः कधी पाहणी केलेली नाही. फक्त प्रकरण दडपण्यासाठी हेतुपूर्वक विलंब करुन “टाइमपास” करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जर वरीष्टांना या कृत्या बाबत शासकीय अधिकार्यांची तक्रार केल्यास यवतमाळातील अधिकार्याचा तोल जाऊन, चिडुन कुठल्याही स्तरावर जातांना दिसत आहे. ह्या अश्या बेताल वागण्याचा बोध होत नाही त्यामुळे याचा शोध मा.जिल्हाधिकार्यांनी घेण्याची सक्त गरज आहे. त्यामुळे कदाचीत भ्रष्टाचार मालीकेचा धागा सापडण्यास व कारवाई करण्यास मदत होईल हे निश्चित. असे पञकार अमोल कोमावार यांनी पोलीसवाला ऑनलाइन मिडियाशी बोलतांना सांगीतले.