Home जळगाव जागतिक उर्दू दिनानिमित्त मन्यार बिरादरीचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

जागतिक उर्दू दिनानिमित्त मन्यार बिरादरीचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

269

उर्दू अकॅडमी व अल्पसंख्यांक आयोग गठित करा

रावेर ( शेख शरीफ)

भारताचे आद्य उर्दू कवी हजरत मोहम्मद इक्बाल यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण विश्वात जागतिक उर्दू दिन म्हणून साजरा केला जात असतो या दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जळगाव जिल्हाधिकारी यांच्या मार्फत ४ मागण्याचे निवेदन दिले असून त्यात प्रामुख्याने
■ नोव्हेंबर २०१९ पासून उर्दू साहित्य अकादमीचे तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे गठन करण्यात आले नसून ते त्वरित गठित करण्यात यावे

■ एमपीएससी परीक्षेत उर्दू भाषेला प्राधान्य देण्यात यावे

■ महाराष्ट्रात प्रादेशिक भाषा मराठी नंतर उर्दू भाषेला दुय्यम स्थान देण्यात यावे.

आशा मागण्या करण्यात आल्या. वास्तविक पाहता उर्दू साहित्य अकॅडमी ची स्थापना उर्दू भाषेचा प्रचार व प्रसारासाठी करण्यात आली असून तीच अकादमी दोन वर्षापासून गठित करण्यात आलेले नाही त्यामुळे उर्दू भाषिकांची न भरून निघणारे नुकसान होत आहे अशी खंत फारूक शेख यांनी तहसीलदार पंकज लोखंडे कडे व्यक्त केली

सदर निवेदनाची प्रत अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री नामदार नवाब मलिक,राज्यमंत्री डॉक्टर विश्‍वनाथ कदम यांना सुद्धा देण्यात आलेली आहे.

सदर निवेदन मन्यार बिरादरीचे अब्दुल रउफ, हमीद शेख, सलीम शेख, अख्तर शेख, सौ अफरोज सैयद व फारूक शेख यांच्या हस्ते महसूल तहसीलदार पंकज लोखंडे यांना देण्यात आले.

*निवेदनावर यांच्या होत्या स्वाक्षऱ्या*

फारुक शेख अब्दुल्ला, सय्यद चाँद अमीर, शेख हमीद कालू, सलीम शेख यासीन, अब्दुल रऊफ रहीम, अख्तर शेख नियमातूल्लाह,ताहेर शेख इब्राहिम, सलीम शेख, मोहम्मद हारून शेख मेहबूब, जहीर शेख हमीद, अब्दुल रौफ शेख दाऊद,तय्यब इब्राहीम? जफर शेख, जावेद, शहेबाज शेख, अमरुल्लाह सय्यद ,शेख सादिक रज्जाक, शेख अलीम रझ्झाक शेख यांची उपस्थी होती.