Home परभणी पूलाच्या मागणीसाठी मच्छी पालन आंदोलन करण्याचा इशारा

पूलाच्या मागणीसाठी मच्छी पालन आंदोलन करण्याचा इशारा

437

प्रतिनिधी / गंगाखेड

चार गावांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील ओढ्यावर पूल बांधावा या मागणीसाठी पुराच्या पाण्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात सोमवारी मच्छी पालन आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी गंगाखेड तहसीलदाराकडे लेखी स्वरूपात दिला आहे.

गंगाखेड तालुक्यातील विठ्ठल वाडी, आनंदवाडी, ईळेगाव मस्नेरवाडी आदी गावांना जाण्यासाठी मरडसगावं येथुन जावे लागते. मरडसगाव च्या पुढे गेल्यावर नागझरी ओढा वाहतो. या ओड्यावर पूल असणं गरजेचे आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही पुल बांधला नाही. ग्रामस्थांनी या संदर्भात वेळोवेळी निवेदने देऊनही त्याचा काय उपयोग झाला नाही. शेवटी कंटाळलेल्या ग्रामस्थांनी गंगाखेड तहसीलदार यांना भेटून नागझरी ओढ्यात ला येणाऱ्या पुराच्या पाण्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात माशा सोडून प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे. या भागात विठ्ठलवाडी येथे मोठा दवाखाना असून यात उपचारासाठी परिसरातील गोपा ,वाघलगाव ,नळद भागातील रुग्ण येतात. या रुग्णांना दवाखान्यात या पुलामुळे जाता येत नाही. या भागातील शेकडो युवक गंगाखेड येथील बाजारपेठेत दुकानावर कामासाठी आहेत .ओढ्याला पाणी येताच त्यांचा रोजगार बुडतो. त्यांना कामावर काढले जाते शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी बाजारात नेता येत नाही. दवाखान्या सारखे महत्त्वाचे उपचारही वेळेवर घेता येत नाहीत .त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो .या सर्व बाबींना कंटाळलेल्या ग्रामस्थांनी मसनेरवाडी चे माजी सरपंच मिसे पाटील आणि परभणी लोकसभा मतदारसंघाचे 2024 चे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मत्स्यपालन आंदोलन करण्याचा इशारा तहसीलदार यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. गुरुवारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.