Home सातारा बलत्काराच्या गुन्हात दोन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक- फलटण...

बलत्काराच्या गुन्हात दोन वर्षे फरारी असलेल्या आरोपीस सिनेस्टाईल पाठलाग करुन अटक- फलटण ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी

445

फलटण (अनिल पवार)

बलत्काराच्या गुन्हयातील दोन वर्षे फरारी आरोपी संदिप धनाजी भोसले रा. निंबळक ता.फलटण यास राहत्या घरी दोन किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग करुन वाजेगाव निंबळक परीसरातून अटक केली आहे.

सातारा पोलिस अधिकक्ष अजयकुमार बंसल , अप्पर पोलिस अधिकक्ष अजित बो-हाडे यांनी फरारी आरोपी शोधमोहीम करुन पकडण्याचे आदेश काढले होते. त्या अनुसंघाने बातमीदारामार्फत सदरचा आरोपी राहत्या निंबळक येथील घरी येणार असल्याची खबर मिळाली असता. सहा.पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे पथकाने सिनेस्टाईल वाजेगाव परीसरात रात्रीच्या अंधारात दोन किलोमीटर पाठलाग करुन आरोपीस मोठ्या शिताफिने पकडले. आरोपीवर 336, 366, 376(2)एन,212,34 कलमाअंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे , पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बरड पोलिस दूरक्षेत्राचे प्रभारी पोलिस अधिकारी अक्षय सोनवणे , पोलिस हवालदार यादव , पोलिस काँस्टेबल गणेश अवघडे यांनी केले आहे.