मनिष गुडधे
अमरावती – त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ १२ तारखेला अमरावतीमध्ये मुस्लिम समुदायाने एक मोर्चा काढला होता परंतू या मोर्चाला कुठल्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नव्हती, अशी माहीती आज एडीजी राजेंद्र सिंह यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयामध्ये झालेल्या पत्रकारपरीषदेमध्ये दीली. यावेळी अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह सुध्दा उपस्थित होत्या.१२ तारखेला अमरावतीमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये १६ ठीकाणी तोडफोड झाली होती, याला प्रत्युत्तर म्हणून १३ नोव्हेंबर रोजी अमरावती मध्ये भारतीय जनता पक्षासह विविध संघटनांनी अमरावती बंदचे आवाहन केले होते, याला अमरावतीकरांनी प्रचंड प्रतिसाद देऊन लाखोंच्या संख्येने रस्त्यावर गर्दी जमली होती. जमलेल्या गर्दीमुळे पुन्हा एकदा अमरावतीमध्ये तोडफोड आणि जाळपोळीचा प्रकार घडला यामुळे पोलीस प्रशासनाला अतिरीक्त पोलीस बल पाचारण करावे लागले होते. तसेच मोर्चेकऱ्यांवर अश्रुधूर, पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करावा लागला होता. काही ठीकाणी रबर बुलेटही वापराव्या लागल्याचे वृत्त आहे. यानंतर अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.शनिवारपर्यंत संचारबंदी (कर्फ्यू) हटणार नाही; पुढील तीन दिवस इंटरनेटही बंद राहणारअमरावतीमधील घडलेले प्रकरण हे सध्या पोलीसांच्या तपासाधिन आहे, यामध्ये अनेक पैलू अद्याप बाहेर यायचे आहेत. त्यामुळे सोशल मिडीयाच्या माध्यमातुन अफवा पसरू नये आणि तणाव वाढू नये याकरिता पुढील तीन दिवस इंटरनेट बंदच असणार असल्याची माहीती या पत्रकारपरीषदेत देण्यात आली. यासोबतच संचारबंदीमध्ये पुढील ७ दिवस कुठलाही बदल होणार नसल्याचे सांगण्यात आहे. ही संचारबंदी टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येणार असून दुपारी २ ते ४ या कालावधीमध्ये अत्यावश्यक/ जिवनावश्यक वस्तूंची खरेदी – विक्री सुरू असेल, अशी माहीती या पत्रकारपरीषदेमध्ये देण्यात आली.