दारव्हा (प्रतिनिधी) – तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व पुरुषांकरिता प्रशिक्षण जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यवतमाळ आयोजित दारव्हा येथे एक महिना कालावधीचे निःशुल्क मोबाईल रिपेरिंगचे प्रात्याक्षिक प्रशिक्षण दिले जाईल.करिता दारव्हा तालुक्यातील युवक व पुरुषांनी या संधीचा लाभ घ्यावा.प्रशिक्षणार्थीचे शिक्षण कमीत कमी सातवी पास ते पुढे असावे.जात प्रवर्ग :- सर्वसाधारण(GENERAl), वयोमर्यादा १८ ते ४५ सोबत लागणारे कागदपत्रे १) टी.सी.(शाळा सोडल्याचा दाखला)२) मार्कसिट ३)आधार कार्ड ४) बँक पासबुक झेरॉक्स प्रत ५) दोन फोटो आवेदन स्विकारण्याची अंतिम तारीख २२/११/२०२१राहील.प्रशिक्षणार्थीची निवड मुलाखती व्दारे करण्यात येईल तसेच प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येईल.अधिकमाहितीसाठी कार्यक्रम आयोजक एम.सी.ई.डी यवतमाळ बिमोद मुधाने ८५५१८७५६२७ या मो.नं.वर संपर्क साधावा. दारव्हा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक व पुरुषांनी निःशुल्क मोबाईल रीपेरिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.रुपेश हिरुळकर साहेब प्रकल्प अधिकारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यवतमाळ यांनी केले आहे.