घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे बुधवारी,ता.१७ रोजी समर्थ आॅप्टिकल्स् आणि साई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.परिसरातील शंभरावर गरजू रूग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.डोळ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले.नेत्ररोग तज्ञ डॉ.पंकज दरक यांनी रूग्णांची मोफत तपासणी करून निदान करण्यात आले.समर्थ आॅप्टिकलचे संचालक एजे पोकळे यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.