घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना-वडीगोद्री या राष्ट्रीय महामार्गावर दि.१९ नोव्हेंबर वार शुक्रवार रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या व विमा कंपनीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात होणार असलेल्या रास्ता रोको दरम्यान गोंदी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
सध्या शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे.शेतकऱ्यांनी वीजबिल भरणा केल्याशिवाय वीज पुरवठा केला जाणार नाही.अशी आडमुठी भूमिका घेतल्याने महावितरणच्या विरोधात व अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊनही पीकविमा न दिल्याने शेतकरी हा हवालदिल झाला असूनही पिक विमा कंपनीने सोयाबीन पिकाचा विमा नामंजूर केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको करण्यात येणार होता.
यावेळी धाकलगाव व परिसरातील शेकडो शेतकरी एकत्र येऊन शेतकऱ्यांनी रॅली काढली.यावेळी विमा कंपनी व शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.गावातून रॅली आल्यानंतर आंदोलक शेतकरी रास्ता रोको करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर आल्यावर शेतकऱ्यांनी घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला.या दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांना गोंदी पोलिसांनी ताब्यात घेतले.
यावेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत विमा कंपनीचा व महावितरणचा निषेध केला.
“विमा आमच्या हक्काचा,नाही कुणाच्या बापाचा”,
“कोण म्हणतो देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही”,
“रिलायन्स विमा कंपनीचा निषेध असो”
आदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,जिल्हा कार्याध्यक्ष राधाकृष्ण मैंद,युवा नेते विष्णू नाझरकर,विद्यार्थी आघाडीचे गणेश गावडे,सचिव पांडुरंग गटकळ,मुबारक शेख,पांडुरंग बांगर,अंकुश तारख,बाबासाहेब दखणे,कानिफनाथ सावंत,शिवाजी शेवाळे,भारत उंडे,सचिन चोरमले,बंडू शिंगटे,या १४ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गोंदी पोलीस ठाण्यातकडे रवाना झाले.
यावेळी अर्जुन शेडगे,माजी सरपंच विजय नाझरकर,पांडुरंग गावडे,रामेश्वर लहाने,राजेंद्र भागडे,अशोक राजपूत,अजय गावडे,चंद्रकांत खमीतकर,अरुण बांगर,महारुद्र केकान,गजानन मुळे,पंडित एसलोटे,अशोक जाधव,भगवान रेगुडे,सुनिल गायकवाड,पोपट खंडागळे,अरबाज काझी,गोरख कोल्हे,राजू उंडे,दत्ता हर्षे,सतीश ढोणे,साळीकराम बाळसराफ आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके,पोकॉ.पगारे,पोकॉ वाघमारे,पोकॉ नागरे,गोपनीय शाखेचे महेश तोटे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.